
Water Chestnuts : शिंगाडा… ज्याला इंग्रजीमध्ये वॉटर चेस्टनट असं देखील म्हणतात… हिवाळ्यात शिंगाड्याच्या मागणीत मोठी वाढ होते. बाजारात हे फळ सहज मिळतं आणि आरोग्यासाठी लाभदायक देखील ठरतं. चवीला गोड आणि कुरकुरीत असलेल्या या फळामध्ये व्हिटॅमिन बी, पोटॅशियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स सारख्या घटक असतात. जे शरीराला अनेक फायदे देण्यासाठी फायदेशीर आहेत. पण असं म्हणतात ना की, जास्त प्रमाणात काहीही सेवन करणं शरीरासाठी हानिकारक असू शकतं. तसंच काही शिंगाड्याचं देखील आहे.
शिंगाड्याचं जर जास्त प्रमाणात सेवन केलं तर ते विविध आरोग्य समस्या निर्माण करू शकतं. तर, वॉटर चेस्टनट खाण्याचे दुष्परिणाम जाणून घेऊया. सांगायचं झालं तर, फार कमी लोकांना माहित असेल की शिंगाडे प्रत्येकासाठी फायदेशीर नाही, जाणून घ्या कोणत्या लोकांनी शिंगाडे खाणं टाळावं.
शिंगाड्यामध्ये फायबरचं प्रमाण अधिक असतं, जे पचनासाठी योग् नसतं… पण, जास्त प्रमाणात सेवन केल्याने गॅस, बद्धकोष्ठता किंवा पोटात जडपणा येऊ शकतो. म्हणून, पोटाच्या समस्या असलेल्या लोकांनी ते कमी प्रमाणात सेवन करावं.
मधुमेह (डायबिटीज) : शिंगाड्यामध्ये नैसर्गिक साखरेचं प्रमाण अधिक असतं. शिंगाड्याचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने रक्तातील साखर वाढू शकते, जी मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक असू शकते. म्हणून, मधुमेहाच्या रुग्णांनी शिंगाडे खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सर्दी – खोकला – वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे अनेकांना सर्दी खोकला होतो… हिवाळ्यात जास्त प्रमाणात शिंगाड्याचं सेवन केल्याने शरीरात थंडी वाढू शकते, ज्यामुळे सर्दी, घसा खवखवणे किंवा कफ यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. ज्या लोकांना आधीच सर्दी किंवा खोकल्याचा त्रास आहे त्यांनी शिंगाडे खाणं टावाळं…
(डिस्क्लेमर : बातमीत दिलेल्या माहितीला आम्ही दुजोरा देत नाही. कोणताही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला घेऊनच उपचार करावेत.)