Psychological Tricks: ही लक्षणं जाणवत असतील तर समजा तुम्हाला हवाय ब्रेक

तुम्हाला कधीकधी खूप इमोशनल वाटतं का ? कधीतरी एखाद्या छोट्याशी गोष्टीवर रडू कोसळतं का ? याचं उत्तर हो असं असेल तर हे भावनिक थकव्याचे लक्षण आहे. अशावेळी स्वत:ला एक ब्रेक द्यायची गरज असते.

Psychological Tricks: ही लक्षणं जाणवत असतील तर समजा तुम्हाला हवाय ब्रेक
Image Credit source: Freepik
| Updated on: Dec 24, 2022 | 3:36 PM

नवी दिल्ली – कधीकधी तुम्हाला असं वाटतं का की काही कारण नसतानाच तुम्ही गरजेपेक्षा जास्त थकला (tired) आहात ? दिवसभरात तुम्ही काहीच प्रोडक्टिव्ह (काम) करत नाही असं वाटतं का ? तुम्हाला कधीकधी खूप इमोशनल (feeling emotional) वाटतं का ? या सर्व प्रश्नांचं उत्तर हो असं असेल तर हे सर्व भावनिक थकव्याचे (Emotional Exhaustion) लक्षण आहे. आता भावनिक थकवा म्हणजे नेमके काय, हे जाणून घेऊया.

जेव्हा एखाद्या व्यक्तीला व्यावहारिक किंवा खासगी जीवनात खूप तणाव जाणवत असेलअशा वेळेस भावनिक थकवा जाणवतो. अशा परिस्थितीत संबंधित व्यक्ती त्या गोष्टी अथवा समस्या योग्यपणे हाताळू शकत नाही , ज्याचा परिणाम आपले करिअर किंवा वैयक्तिक आयुष्यातील नात्यांवर होऊ शकतो. अधिक स्ट्रेस आणि भावनिक थकवा यामुळे ‘डोक्याचं दही’ होत आहे आणि तुम्हाला एका ब्रेकची गरज आहे, याची लक्षण कोणती, हे जाणून घेऊया.

कारणाशिवाय चिडचिड होणे

जर तुम्ही छोट्याछोट्या गोष्टींवर चिडत असाल किंवा रागावत असाल तर हे भावनिक थकव्याचे लक्षण आहे. तुम्ही इमोशनली एवढे तणावात असता की अगदी लहान-सहान गोष्टींनीही तुम्हाला त्रास होतो. जेव्हा तुम्ही भावनिकरित्या थकलेले असता तेव्हा तुम्हाला इमोशन्सवर नियंत्रण ठेवणे कठीण होते.

कोणतंही काम करण्याची इच्छा न होणे

तुम्हाला एखादं किंवा कोणतही काम करण्याची स्वत:हून इच्छा होत नसेल तर तेही भावनिक थकव्याचेच लक्षण असते. यामुळे तुमची प्रोडक्टिव्हिटी (उत्पादनक्षमता) कमी होते. भावनिक ताण असेल तर फोकस कमी होतो, लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमेतवर परिणाम होतो व काम करण्याची इच्छा होत नाही.

सतत अस्वस्थ वाटणं

जर तुम्ही भावनिकदृष्ट्या थकला असाल तर तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टींनी अस्वस्थ होता. कोणत्याही कारणाशिवाय अस्वस्थं वाटतं, स्ट्रेस येतो.

शांत झोप न लागणे

भावनात्मक थकव्याचा सर्वात जास्त परिणाम तुमच्या झोपेवर होतो. तुम्हाला शांत आणि गाढ झोप लागत नसेल किंवा रोज मध्येच जाग येत असेल तर हे भावनिक थकव्याचेच लक्षण आहे.

कारणाशिवाय रडू येणे

जेव्हा तुम्ही भावनिकदृष्ट्या थकता तेव्हा तुम्हाला तुमच्या भावनांवर फोकस करता येत नाही. अशा परिस्थितीत एखाद्या छोट्याशा गोष्टीचाही तुम्ही त्रास करून घेता. बऱ्याच वेळेस तुम्ही रडून तुमच्या भावना व्यक्त करता. एखाद्या छोट्याशा गोष्टीवरही तुम्हाला रडायला येतं.

खाण्या-पिण्याची पद्धत बदलणे

जेव्हा तुम्ही तणावात असता किंवा भावनिकदृष्ट्या थकता तेव्हा तुमची खाण्या-पिण्याची सवय अथवा पद्धत बदलते. कधी तुम्ही नेहमीपेक्षा अधिक खाऊ लागता तर कधी तुमचं जेवण अगदीच कमी होऊन जातं. बऱ्याच वेळेस असंही होत की तुम्हाला भूक लागलेली नसते तरी तुम्हाला काहीतरी खाण्याची इच्छा होते.

भावनिकदृष्ट्या थकवा आला असेल तर ब्रेक घेणं व्यर्थ असतं, असं आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटतं. मात्र तुम्ही जर खूप तणावात किंवा स्ट्रेसमध्ये असाल तर एक ब्रेक घेणं हे शहाणपणाचं लक्षण असतं. ब्रेक घेतल्यावर तुम्ही प्रत्येक गोष्टीबद्दल शांतपणे व योग्य विचार करू शकता. पण ब्रेक घेतलाच नाही तर तुम्ही कोणत्याच गोष्टीवर नीट फोकस करू शकणार नाही आणि तुमच्याकडून व्यावहारिक अथवा वैयक्तिक आयुष्यात आणखी चुका होऊ शकतील.