चपाती की भात? वजन कमी करायला काय खाणं सोडून द्यावं?

पोट आणि कमरेची चरबी कमी करण्यासाठी काही लोक भात आणि चपाती खाणे सोडून देतात. पण वजन कमी करण्याचा हा योग्य मार्ग आहे का? आणि त्याचा फायदा होईल की नाही? चला तर मग जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी काय कमी खावं.

चपाती की भात? वजन कमी करायला काय खाणं सोडून द्यावं?
Rice or chapati for weight loss
Image Credit source: Social Media
| Updated on: Apr 07, 2023 | 6:06 PM

मुंबई: वजन कमी करणं कुणासाठीही सोपं नसतं, त्यासाठी तुम्हाला हेवी वर्कआउट आणि कडक डाएट रूटीन फॉलो करावं लागतं. पोट आणि कमरेची चरबी कमी करण्यासाठी काही लोक भात आणि चपाती खाणे सोडून देतात. पण वजन कमी करण्याचा हा योग्य मार्ग आहे का? आणि त्याचा फायदा होईल की नाही? चला तर मग जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी काय कमी खावं.

चपाती आणि भातात किती कॅलरीज असतात?

साहजिकच जेव्हा लोक चपाती आणि भात खात नाहीत, तेव्हा त्यांना फळे आणि कोशिंबीरावर जगावे लागतं. खरं तर एका चपातीमध्ये जवळपास 140 कॅलरीज असतात, तर अर्ध्या वाटी तांदळात तेवढ्याच कॅलरीज असतात. म्हणजे भात खा किंवा चपाती, तुमच्या कॅलरीच्या सेवनावर फारसा परिणाम होणार नाही. तथापि, आपण किती भात आणि किती चपाती खात आहात हे निश्चितपणे महत्वाचे आहे.

वजन वाढल्याने आरोग्याचे अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते, आधी बॅड कोलेस्टेरॉलची पातळी वाढते, मग मधुमेहाचा धोका निर्माण होतो. तसेच उच्च रक्तदाबाला सामोरे जावे लागते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका, कोरोनरी आर्टरी डिसीज आणि ट्रिपल व्हेसल डिसीज सारखे जीवघेणा आजार होतात. त्यामुळे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.

वजन वाढवायचं असेल तर गव्हाच्या पिठाच्या चपाती ऐवजी मल्टीग्रेन पिठाची चपाती खा. यामध्ये मका, बाजरी, ज्वारी, नाचणी, हरभरा, ज्वारी यांचा समावेश आहे. त्यामध्ये तुलनेने कॅलरी कमी असतात, जे वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे.

पांढरा तांदूळ, ज्याला रिफाइन तांदूळ म्हणून देखील ओळखले जाते, वजन वाढविण्यात उपयुक्त आहे. त्याऐवजी तपकिरी तांदूळ, काळा तांदूळ, लाल तांदूळ आणि जंगली तांदूळ यांचे सेवन वाढवा.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)