‘तुझा नवरा म्हातारा आहे’ म्हणत त्याने माझ्या पँटमध्ये हात… महिलेने सांगितला इमिग्रेशन ऑफिसरसोबतचा धक्कादायक प्रसंग
21 वर्षीय या महिलेने तिच्यासोबत घडलेली घटना सांगून एकच खळबळ माजवून दिली आहे. हे नेमकं प्रकरण काय आहे आणि कुठे घडलं याबद्दल जाणून घ्या.

लेबनॉनच्या एका महिलेने टेक्सासमधील एका डिटेन्शन केंद्राविरुद्ध गंभीर आरोप केले आहेत. 21 वर्षीय या महिलेचा दावा आहे की, तिकडच्या एका इमिग्रेशन ऑफिसरने तिला ‘ग्रीन कार्ड’ मिळवून देण्याच्या बदल्यात वाईट वागणूक दिली. तिने असा दावा केला आहे की त्या इमिग्रेशन ऑफिसरने शरीर सुखाच्या बदली तिला ग्रीन कार्ड मिळवून देण्याच्या प्रस्थाव दिला. ही घटना हे प्रकरण टेक्सासमधील ‘इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट’ (ICE) शी संबंधित आहे. पण अमेरिकी अधिकाऱ्यांनी या आरोपाला नाकारले आहे. या महिलेचे नाव राहफ अली अल्मेरहिज असे आहे. तिला लूसी वाइज या नावानेही ओळखले जाते. रिपोर्टनुसार, तिने आपली ओळख उघड करण्यास संमती दिली आहे.
महिलेचा आरोप काय?
महिलेचा असा दावा आहे की, आयसीई (ICE) डिपोर्टेशन अधिकारी मार्केल वॉलेस याने तिला रेमंडविले येथील ‘एल व्हॅले’ कोठडी केंद्रातील एका खोलीत नेले आणि तिथे तिच्या संमतीशिवाय तिचे विनयभंग केले. न्यूजवीकसोबतच्या एका मुलाखतीत तिने दावा केला आहे की, तिला धमकी देण्यात आली की तुझा नवऱ्याला जेलमध्ये टाकण्यात आले. याशिवाय त्याला हद्दपार करण्याची धमकी देण्यात आली होती. तिने हे ही सांगितले की, त्या माणसाने तिला म्हटले, “मी तुला ‘ग्रीन कार्ड’ मिळवून देईन.” पुढे तो असेही म्हणाला की, “तुझा पती म्हातारा माणूस आहे. तो तुझ्यासाठी काहीही करू शकत नाही.”
चुकीच्या गोष्टी करायला लागला
त्या महिलेने पुढे सांगितले की, त्या पोलीस अधिकारी वॉलेसने सांगितले की, केवळ तोच तिला मदत करू शकतो. महिलेच्या म्हणण्यानुसार, तपासकर्त्यांशी संवाद साधण्यापूर्वी, तो अधिकारी तिला एका खोलीत घेऊन गेला. त्या खोलीत घेऊन जाऊन अधिकाऱ्याने त्या महिलेच्या पॅन्टमध्ये हात घालून चुकीची कृत्य करू लागला. याशिवाय त्याने माझी पॅन्ट खेचून मला अर्धनग्न केले. या महिलेने सांगितलं की, यासाठी तिने सहमती दिलेली न्हवती आणि त्या अधिकाऱ्याला थांबवण्याचा तिने प्रयत्न केला.
तिच्यावर दबाव आणण्याचा केला प्रयत्न
त्या महिलेने पुढे सांगितले की, वॉलेसने आपल्या पदाचा आणि तिच्या इमिग्रेशन दर्जाचा वापर करून तिच्यावर दबाव आणला. त्या अधिकाऱ्याने सांगितले की, तो माझी सुटका करून देण्यात मदत करू शकतो. याशिवाय त्याने मला ‘ग्रीन कार्ड’ मिळवून देण्याचे आमिषही दाखवले. यानंतर त्याने त्याचा फोननंबरही दिला आणि मॅक्सीकोला जाण्याची ऑफर दिली. या सगळ्या गोष्टीमुळे या महिलेचे आयुष्य उद्धवस्थ झाल्याचे ती म्हणते.
फेब्रुवारी महिन्यात रिओ ग्रांडे व्हॅलीजवळ अल्मेरहिजला अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ती ऑगस्ट २०२४ मध्ये मॉन्ट्रियलमार्गे बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेशली होती.