AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेपाळच्या हायड्रो पॉवर कर्मचाऱ्यांच्या सुटकेसाठी चीनची मदत, बोगद्याच्या वरच्या भागात ड्रीलिंग, युद्धपातळीवर प्रयत्न सुरु

नेपाळच्या हायड्रोपॉवरचे नवशेहून अधिक कर्मचारी भूयारात अडकले असून त्यांना सोडवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु करण्यात येत आहेत.

नेपाळच्या हायड्रो पॉवर कर्मचाऱ्यांच्या सुटकेसाठी चीनची मदत,  बोगद्याच्या वरच्या भागात ड्रीलिंग,  युद्धपातळीवर प्रयत्न सुरु
Trishuli–3A Hydropower Project
| Updated on: Aug 30, 2026 | 7:22 PM
Share

नेपाळमध्ये ग्लेशियर कोसळून बुधवारी आलेल्या महापुराने आतापर्यंत 768 जणांचा बळी घेतला आहे.आतापर्यंत सुरक्षा दलांनी पाच हजार जणांना रेस्क्यू केले आहे. या पुरातील मृतदेहांना जतन करण्याचे अवघड शिवधनुष्य नेपाळला पेलावे लागत आहे. या महापुरात नेपाळच्या हायड्रोपॉवरचे 900 हून अधिक कर्मचारी बेपत्ता असल्याचे वृत्त काल आले होते. हे कर्मचारी टनेलमध्ये अडकले असून त्यांच्या सुटकेसाठी या टनेलच्या वरच्या भागात ड्रीलिंगने होल करुन ऑक्सिजन आणि अन्न पाकिटे पुरवली जात आहेत. या टनेलच्या प्रवेशमार्गातील चिखळ आणि गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

नेपाळच्या हायड्रो पॉवर प्लाटचे 900 कर्मचारी बुधवारपासून बेपत्ता असल्याचे वृत्त नेपाळी मिडियाने दिले होते. मात्र अद्यापपर्यंत या कर्मचाऱ्यांचा कोणताही थांगपत्ता लागलेला नव्हता. आता हे कर्मचारी एका टनेलमध्ये अडकल्याचे वृत्त आहे.या कर्मचाऱ्यांची सुटका करण्यासाठी या बोगद्याला वरच्या दिशेने ड्रिलिंग करण्यात आले आहे.यातून ऑक्सिजन आणि आत अन्नपदार्थ सोडले जात आहेत. या टनेलच्या प्रवेशद्वारावर पुराने वाहून आलेला चिखळयुक्त गाळ भरला आहे. त्यामुळे हे कर्मचारी अडकले आहेत.

हायड्रो वीज प्रकल्पाच्या बोगद्याचे तोंड सापडले

भोतेकोशी येथील पुराने भरलेल्या अपर त्रिशुली–3A Hydropower Project च्या टनेलचे मुख अखेर सापडलेले आहे. जमीनीत पाडलेल्या उभ्या होलपासून वरच्या बाजूला सुमारे ४० मीटर अंतरावर बोगद्याचे तोंड सापडल्याचे टनेल तज्ज्ञ आणि आरएसपी ( RSP ) एमपी अभियंता श्रीराम नेउपाने यांनी म्हटले आहे. बचाव पथक यापूर्वी ड्रिलिंग आणि उत्खननाद्वारे बोगद्याचा वरचा भाग ( कमान ) शोधण्याचा प्रयत्न करत होते. आता बोगद्याचे प्रवेशद्वार सापडल्यामुळे, हायड्रो वीज प्रकल्पाच्या बोगद्यात अडकलेल्या तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांच्या सुटकेच्या मोहीमेला आता वेग आला आहे.

चीनच्या अधिकाऱ्यांची एक टीमही मदतीला

नेपाळची आर्मी, नेपाळ विद्युत प्राधिकरण आणि बोगदा तज्ज्ञांची एक टीम ड्रिलिंग मशिन्स, एक्स्कॅव्हेटर्स आणि इतर उपकरणांचा वापर करून या बोगद्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग तयार करण्याचे काम युद्ध पातळीवर करीत आहे. चीनच्या अधिकाऱ्यांची एक टीमही नेपाळी तंत्रज्ञांना मदत करीत आहे. या प्रोजेक्टच्या पॉवर हाऊसमध्ये पुर आला तेव्हा ४० ते ४५ तंत्रज्ञ आणि कर्मचारी काम करत होते. ते देखील या टनेलमध्ये अडकलेले आहेत.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक