AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेची उडाली झोप, मोठ्या हल्ल्याचा कट, धक्कादायक माहिती, थेट आयसिसकडून…

अमेरिकेत काही दिवसांपूर्वीच व्हाईट हाऊसजवळ मोठा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोन नॅशनल गार्ड ठार झाले. त्यामध्येच आता जगाची झोप उडवणारी माहिती पुढे येत आहे. अमेरिकेवर मोठा दहशतवादी हल्ला होणार होता.

अमेरिकेची उडाली झोप, मोठ्या हल्ल्याचा कट, धक्कादायक माहिती, थेट आयसिसकडून...
terrorist attack on United States
| Updated on: Jan 03, 2026 | 9:26 AM
Share

नुकताच अमेरिकेच्या न्याय विभागाने केलेल्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली. अमेरिकेवर एक मोठा हल्ला होणार होता, जो सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावल्याचा दावा करण्यात आला. हैराण करणारे म्हणजे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येलाच हा हल्ला होणार होता. अमेरिकेच्या न्याय विभागाने घोषणा केली की, त्यांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅरोलिनामध्ये इस्लामिक स्टेट अर्थात आयसिसशी संबंधित एका संशयिताला हल्ला करण्याचा कट रचल्याच्या कारणावरून अटक केली. एएफपी या वृत्तसंस्थेनुसार, अमेरिकन फेडरल एजंट्सनी बुधवारी 18 वर्षीय ख्रिश्चन स्टर्डिव्हेंटला हल्ल्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली अटक केली. या प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे आली. याबाबतची सविस्तर माहिती एफबीआयचे संचालक काश पटेल यांनी दिली.

काश पटेल यांनी स्पष्टपणे म्हटले की, अधिकाऱ्यांनी हा मोठा हल्ला उधळून लावला. पटेल यांनी फेसबुक हँडलवर लिहिले की, एफबीआय आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला आयसिसच्या व्यक्तीने आखलेला आणखी एक संभाव्य हल्ला हाणून पाडला आहे… या सोशल मीडियावर पोस्टमुळे मोठी खळबळ उडाली. काही दिवसांपूर्वीच व्हाईट हाऊसच्या अगदी जवळ मोठा हल्ला झाला. ज्यामध्ये दोन नॅशनल गार्डचा जीव गेला.

या गोष्टीला काही दिवस झाले नाहीत तोवरच दुसरा नवीन वर्षाच्या पुर्वसंध्येला अमेरिकेत दहशतवादी हल्ला होणार होता.  हेच नाही तर काश पटेल यांनी हे देखील स्पष्ट केले की, लवकरच याबाबत एफबआ पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देईल. नॉर्थ कॅरोलिनातील कोर्टाने त्या व्यक्तीला 7 जानेवारी रोजीच्या पुढील सुनावणीपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सध्या त्याची चाैकशी सुरू आहे.

एफबीआय एजंट्सनी स्टर्डिव्हँटला पटवून दिले की तो इस्लामिक स्टेट गटाचे सदस्य आहे. त्याने आयसिस आणि जिहादबद्दल भाष्य केले. आयसिससाठीच त्यांने दहशतवादी हल्ल्याचे नियोजन केले होते. एफबीआयला स्टर्डिव्हेंटबद्दल 2022 पासून माहिती होती. त्यावेळी तो सोशल मीडियाच्या माध्यमातून आयएसआयएसच्या सदस्याच्या संपर्कात होता. त्यावेळी तो अल्पवयीन होता. या प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे येताना दिसत आहे.

उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात, सूर्याजी पिसाळशी केली गद्दारीची तुलना
उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात, सूर्याजी पिसाळशी केली गद्दारीची तुलना.
आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात बंड कायम; उमेदवारानं अर्ज मागे नाहीच
आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात बंड कायम; उमेदवारानं अर्ज मागे नाहीच.
'तपोवनमधील झाडं तोडणार, असं बोलणाऱ्या मंत्र्याचा माज उतरवायचाय...'
'तपोवनमधील झाडं तोडणार, असं बोलणाऱ्या मंत्र्याचा माज उतरवायचाय...'.
अर्ज गिळणाऱ्या उमेदवाराची माघार, उमेदवाराला अश्रू अनावर; शिंदे म्हणाले
अर्ज गिळणाऱ्या उमेदवाराची माघार, उमेदवाराला अश्रू अनावर; शिंदे म्हणाले.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीला ऊत
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीला ऊत.
हरिभाऊ राठोड यांच्यासोबत वाद अन् व्हायरल व्हिडीओवर नार्वेकरांचा खुलासा
हरिभाऊ राठोड यांच्यासोबत वाद अन् व्हायरल व्हिडीओवर नार्वेकरांचा खुलासा.
नाशकात हायव्होल्टेज ड्रामा, बंडखोर उमेदवाराला कार्यकर्त्यांनी कोंडलं
नाशकात हायव्होल्टेज ड्रामा, बंडखोर उमेदवाराला कार्यकर्त्यांनी कोंडलं.
तो बदनाम माणूस, त्याला मतदान करू नका, इच्छुक नाराज उमेदवारांचा गोंधळ
तो बदनाम माणूस, त्याला मतदान करू नका, इच्छुक नाराज उमेदवारांचा गोंधळ.
राहुल नार्वेकर-हरिभाऊ राठोड यांच्यात बाचाबाची, कारण काय? Video व्हायरल
राहुल नार्वेकर-हरिभाऊ राठोड यांच्यात बाचाबाची, कारण काय? Video व्हायरल.
कल्याण-डोंबिवलीत महायुतीचे 9 उमेदवार नगरसेवक, कोणाचे किती बिनविरोध?
कल्याण-डोंबिवलीत महायुतीचे 9 उमेदवार नगरसेवक, कोणाचे किती बिनविरोध?.