AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अख्ख्या पाकिस्तानला सर्वात मोठा हादरा… 58 पाक सैनिकांचा झटक्यात खात्मा… जगही हादरलं; कुणी केला मोठा गेम..

अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्री मौलवी मोहम्मद याकूब मुजाहिद यांनी नुकताच पत्रकार परिषद घेत अत्यंत धक्कादायक अशी माहिती शेअर केली. अफगाणिस्तानच्या दाव्यानंतर जगात एकच खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय. हा पाकिस्तानी लष्करावर मोठा हल्ला म्हणाला लागेल.

अख्ख्या पाकिस्तानला सर्वात मोठा हादरा... 58 पाक सैनिकांचा झटक्यात खात्मा... जगही हादरलं; कुणी केला मोठा गेम..
Afghanistan attack on Pakistan
| Updated on: Oct 12, 2025 | 2:12 PM
Share

अफगाणिस्तानने शनिवारी रात्री उशिरा मोठा हल्ला पाकिस्तानच्या लष्कर चाैक्यांवर केला. रात्रभर हा हल्ला सुरू होता. आता पाकिस्तानला झटका देणारी माहिती पुढे आली असून अफगाणिस्तानने या हल्ल्यात पाकिस्तानच्या तब्बल 58 सैनिकांना ठार केले. अफगाणिस्तानच्या निशाण्यावर पाकिस्तानच्या लष्कर चाैक्या होत्या. 25 चाैक्या पाकिस्तानच्या या अफगाणिस्तानच्या ताब्यात आहेत. पाकिस्तानच्या सात सैनिकांना अफगाणिस्तानने ओलिसही ठेवलंय. हा पाकिस्तानच्या लष्करावरील सर्वात मोठा हल्ला असल्याचे बोलले जातंय. या हल्ल्याने संपूर्ण जगात एकच खळबळ उडाल्याचे बघायले. पाकिस्तानला या हल्ल्याचा इतका मोठा धक्का बसला की, त्यांनी यावर अजून भाष्य देखील केले नाहीये.

पाकिस्तानने गुरूवारी काबुलवर बॉम्ब टाकले, त्याला उत्तर म्हणून अफगाणिस्तान सरकारने हा हल्ला केला. तालिबान सरकारचे मुख्य प्रवक्ते जबिहुल्लाह मुजाहिद म्हणाले की, अफगाण सैन्याने 25 पाकिस्तानी लष्करी चौक्या ताब्यात घेतल्या आहेत, त्यात 58 पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. अफगाणिस्तानच्या हल्ल्यात 30 हून अधिक पाकिस्तानी सैनिक जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्री मौलवी मोहम्मद याकूब मुजाहिद यांनी नुकताच पत्रकार परिषद घेतली.

जग हादरवणारी माहिती अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्री मौलवी मोहम्मद याकूब मुजाहिद यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. त्यांनी स्पष्ट म्हटले की, अफगाणिस्तानची सुरक्षा समाधानकारक आहे. पाकिस्तानी लष्करातील एक विशिष्ट गट अफगाणिस्तानातील सुरक्षा व्यवस्था कमकुवत करण्याचा आणि अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. हा गट खोटा प्रचार करत आहे. सीमेवर हल्ल्यांना प्रोत्साहन देत आहे. इस्लामिक अमिरात कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यास तयार आहे.

पुढे बोलताना संरक्षणमंत्र्यांनी म्हटले की, पाकिस्तानी गटाने आयसिसच्या उपस्थितीकडे दुर्लक्ष केले आहे. पाकिस्तानने आपल्या भूमीवर आयसिसच्या उपस्थितीकडे दुर्लक्ष केले आहे. मुळात म्हणजे अफगाणिस्तानला त्याच्या हवाई आणि सीमांचे रक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि कोणताही हल्ला अनुत्तरीत राहणार नाही. यासोबतच आमच्या हल्ल्यात 58 पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचे त्यांनी स्पष्ट म्हटले. पाकिस्तानच्या सैनिकांना ओलीस ठेवलेला फोटोही त्यांनी यावेळी शेअर केला.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?