AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tibet Earthquake: नेपाळनंतर तिबेट हादरले, अवघ्या चार तासात शक्तिशाली भूकंपाचे धडाधड 13 धक्के, 16 जणांचा मृत्यू

Tibet Earthquake: चीनच्या ताब्यातील तिबेट स्वायत्त प्रदेशात गुरूवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. तिबेटमध्ये अवघ्या चार तासांच्या कालावधीत धडाधड 13 भूकंपाचे धक्के जाणवेल. सर्वाधिक शक्तिशाली भूकंपाचा धक्का हा रात्री 8 वाजून 3 मिनिटांनी जाणवला. त्याची रिश्टर स्केलवर तीव्रता 7 इतकी होती.

Tibet Earthquake: नेपाळनंतर तिबेट हादरले, अवघ्या चार तासात शक्तिशाली भूकंपाचे धडाधड 13 धक्के, 16 जणांचा मृत्यू
नेपाळनंतर तिबेट हादरले, अवघ्या चार तासात भूकंपाचे धडाधड 13 धक्के
| Updated on: Oct 23, 2026 | 8:35 AM
Share

Tibet Earthquake: चीनच्या ताब्यातील तिबेट स्वायत्त प्रदेशात गुरूवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. या शक्तिशाली भूकंपाने रात्रभर नागरीक जीव मुठीत ठेवून होते. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या माहितीनुसार, तिबेटमध्ये अवघ्या चार तासांच्या कालावधीत धडाधड 13 भूकंपाचे धक्के जाणवेल. सर्वाधिक शक्तिशाली भूकंपाचा धक्का हा रात्री 8 वाजून 3 मिनिटांनी जाणवला. त्याची रिश्टर स्केलवर तीव्रता 7 इतकी होती.

तिबेटमध्ये भूकंपाची मालिका

रात्री 8 वाजून 3 मिनिटांनी भूकंपाचा 7 तीव्रतेचा मुख्य धक्का बसला. त्यानंतर रात्रभर तिबेटमधील जमीन हादरत होती. रिश्टर स्केलवर 5, 4.8, 4.7 आणि 4.3 अशा तीव्रतेचे एकामागून एक धक्के बसत होते. त्यामुळे नागरिकांनी रात्र जागून काढली. नागरीक भयभीत झाले होते. भूकंपाचा केंद्रबिंदु हा तिबेटची राजधानी ल्हासापासून 400 किलोमीटर अंतरावर जमिनीखाली 173 किलोमीटर खोलीवर असल्याचे समोर आले आहे. प्रशासनाने तात्काळ मदत कार्याला सुरुवात केली आहे.

16 जणांचा मृत्यू जीवितहानी नाही, प्रशासन सतर्क

तिबेटमध्ये शक्तिशाली भूकंपाचे सलग 13 धक्के बसले. यामुळे मोठ्या नुकसानीची भीती व्यक्त केली जात होती.  प्राथमिक माहितीनुसार, यामध्ये 16 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.  अद्याप मोठ्या आर्थिक नुकसानीची नोंद झालेली नाही. आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक प्रशासन नैसर्गिक आपत्तीवर, संकटावर लक्ष ठेवून आहे. तातडीने मदतीलाही सुरूवात झाली आहे. तर नुकसानीचा अंदाजही घेण्यात येत आहे. तिबेट परिसरातील धरण, तलाव आणि नद्यांवरही प्रशासनाने लक्ष ठेवले आहे. नेपाळसारखी आपत्ती ओढावू नये यासाठी प्रशासन खबरदारी घेत आहे.

भूगर्भीय तणावामुळे भूकंप

भूगर्भशास्त्रज्ञांनुसार, तिबेटचे पठार हे भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील आहे. भारतीय टेक्टोनिक प्लेट आणि युरेशियन टेक्नोटिक प्लेट यांच्यातील हालचाली आणि घर्षणामुळे वारंवार भूकंपाचे हादरे बसतात. पण यावेळी त्याची तीव्रता अधिक जाणवली. वाढते तापमान, वेगाने वितळणाऱ्या हिमनद्या आणि हवामानातील बदलामुळे भूगर्भीय हालचाली वाढल्या आहेत.  नेपाळमधील विनाशकारी भूकंप आणि त्यानंतर आलेल्या महापूरामुळे हजारो लोकांचा जीव गेला. त्यात अनेक पर्यटकांचाही समावेश होता. हिमालयातील हिमनद्या आणि हिम तलावांना यामुळे धोका निर्माण झाल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. आता तिबेटमधील भूकंपनाने पुन्हा धोक्याची घंटा वाजवली आहे.

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ