AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इस्रायलसोबत युद्धानंतर आता इराणची या देशावर मोठी कारवाई, समोर आलं धक्कादायक कारण

इराणनं आता आपला मोर्चा अफगाणिस्तानकडे वळवला आहे, इराणमध्ये राहाणाऱ्या अफगाणिस्तानी नागरिकांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

इस्रायलसोबत युद्धानंतर आता इराणची या देशावर मोठी कारवाई, समोर आलं धक्कादायक कारण
| Updated on: Jun 27, 2025 | 7:26 PM
Share

इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध झालं, या युद्धामध्ये दोन्ही देशांचं मोठं नुकसान झालं आहे. अखेर आता दोन्ही देशांकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. युद्धवीरामानंतर आता इराणने अफगाणिस्तानविरोधात मोठं पाऊल उचललं आहे. सध्या अफगाणिस्तानमध्ये तालिबाणची सत्ता आहे. युद्धात मदत केली नाही, इराणला समर्थन दिलं नाही म्हणून इराणने ही कारवाई सुरू केल्याचं बोललं जात आहे, इराणमध्ये अवैध मार्गानं घुसखोरी केलेल्या अफगाणी नागरिकांची इराणमधून हकालपट्टी सुरू आहे, तर दुसरीकडे तेहरामध्ये आलेल्या अनेक अफगाणिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.

मिळत असलेल्या माहितीनुसार शेजारी राष्ट्र असून देखील अफगाणिस्तानने युद्धादरम्यान इराणची कोणतीच मदत केली नाही, त्यांना समर्थन दिलं नाही, म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. इराण सध्या अफगाणिस्तान विरोधात कडक भूमिका घेण्याच्या तयारीमध्ये आहे.

आतापर्यंत काय कारवाई केली?

बीबीसी पर्सियनने दिलेल्या वृत्तानुसार तेहरामध्ये पाच अफगाणिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. हे सर्व मोसादचे हेर असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याबाबत बोलताना तालिबानचे प्रवक्ते मुजाबिद यांनी म्हटलं आहे की, इराणमध्ये सुरू असलेल्या घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, पाहू पुढे काय होतं ते अशी प्रतिक्रिया यावर आफगाणिस्तानकडून देण्यात आली आहे.

दुसरीकडे टोलो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार इराणकडून अफगाणिस्तानवर कारवाईला सुरुवात झाली आहे. इराणने अफागाणिस्तानच्या नागरिकांच्या अटकेमध्ये चार पटीनं वाढ केली आहे. या सर्व लोकांना नियमांचं उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे, मात्र ज्यांना अटक करण्यात आली आहे, ते लोक आधीपासूनच इराणमध्ये शरणार्थी म्हणून राहात होते, आतापर्यंत तब्बल तीस हजार अफागाणिस्तानी नागरिकांना इराणकडून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे, तर अनेकांना अटक करण्यात आली आहे.

युद्धात इराणचं प्रचंड नुकसान 

इस्रायलसोबत झालेल्या युद्धामध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे, इस्रायलसोबत अमेरिकेकडून देखील इराणवर हल्ला करण्यात आला, अमेरिकेकडून इराणच्या अणू केंद्रांना लक्ष्य बनवण्यात आलं.

Follow Us
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...