US Iran Update : रॅपिड ड्रॅगन, डार्क इगल अमेरिकेने ही घातक शस्त्र अजून काढलीच नाहीत, ती वापरली तर इराणची काय हालत होईल?

US Iran Update : अजूनही अमेरिकेकडे अशी शस्त्र आहेत, जी त्यांनी इराण विरोधात वापरलेलीच नाहीत. या शस्त्रांमध्ये हायपरसोनिक स्पीड, खास बंकर भेदण्याची क्षमता आणि मोठ्या प्रमाणात विद्धवंस घडवून आणण्याची ताकद आहे. ती वापरली तर इराणची काय हालत होईल?.

US Iran Update : रॅपिड ड्रॅगन, डार्क इगल अमेरिकेने ही घातक शस्त्र अजून काढलीच नाहीत, ती वापरली तर इराणची काय हालत होईल?
AGM-183A ARRW on a B-52
Image Credit source: wikipedia
| Updated on: Apr 07, 2026 | 2:35 PM

इराण विरुद्ध सुरु झाल्यापासून अमेरिकेने त्यांच्याविरोधात आतापर्यंत टॉमहॉक मिसाइल, JASSM-ER क्रूज मिसाइल, GBU-57 MOP बंकर बस्टर आणि GBU-72 सारख्या शस्त्रांचा वापर केला आहे. MOAB (GBU-43) मदर ऑफ ऑल बॉम्ब हा सुद्धा काही हल्ल्यांमध्ये वापरण्यात आला आहे. या बॉम्बेमुळे इराणच्या न्यूक्लियर साइट्स, मिसाइल कारखाने आणि अंडरग्राऊंड बंकर यांचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे.

अजूनही अमेरिकेकडे अशी शस्त्र आहेत, जी त्यांनी इराण विरोधात वापरलेलीच नाहीत. या शस्त्रांमध्ये हायपरसोनिक स्पीड, खास बंकर भेदण्याची क्षमता आणि मोठ्या प्रमाणात विद्धवंस घडवून आणण्याची ताकद आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प वारंवार इशारा देत आहेते की, इराण नाही ऐकला तर यापेक्षा जास्त शक्तीशाली हल्ले होतील. प्रश्न हा आहे की, ट्रम्प आता राखीवमध्ये ठेवलेली ही शस्त्र वापरणार का?

AGM-183 ARRW  

AGM-183 ARRW हे अमेरिकेचं हायपरसोनिक मिसाइल आहे. 6000 किलोमीटर प्रतीतास वेगाने हे उड्डाणं करतं. याचं वजन जवळपास 3000 किलो आहे. 1000 ते 1500 किलोमीटरपर्यंत हल्ला करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. B-52H, B-1B किंवा F-15E सारख्या जेटमधून हे क्षेपणास्त्र डागता येतं.

रॉकेट बूस्टरम या क्षेपणास्त्राला उंचावर घेऊन जातं. ग्लाइड बॉडी वेगळी होऊन शत्रुच्या एअर डिफेन्सला चकवा देऊन टार्गेटला हिट करते. इराण युद्धात हे मिसाइल अजून वापरलेलं नाही. कारण ते अजून ऑपरेशनल नाहीय. टेस्टिंग सुरु आहे.

Dark Eagle

Dark Eagle ही Long-Range Hypersonic Weapon (LRHW) आहे. अमेरिकन आर्मीची ही ग्राउंड-लॉन्च् हायपरसोनिक सिस्टिम आहे. ट्रक-माउंटेड लॉन्चर वरुन ही मिसाइल डागता येते. याची रेंज 1700 ते 3500 किलोमीटर पर्यंत आहे. इराणच्या कुठल्याही भागाला हे मिसाइल सहज टार्गेट करु शकतं.

हे मिसाइल बूस्ट-ग्लाइड टेक्नोलॉजी वर चालतं. शत्रुचं रडार आणि इंटरसेप्टर या मिसाइलला पकडू शकत नाही. इराण युद्धात त्याचा वापर झालेला नाही. प्रामुख्याने चीन आणि रशिया सारख्या मोठ्या शत्रू देशांसाठी हे मिसाइल रिझर्व्हमध्ये ठेवलं आहे.

Rapid Dragon

Rapid Dragon अमेरिकी एअर फोर्सची एक अनोखी आणि स्मार्ट सिस्टिम आहे. कुठलंही मालवाहतूक विमान या सिस्टिममुळे अस्थायी मिसाइल लॉन्चर पॅड बनू शकतं. यात JASSM-ER किंवा दुसऱ्या मिसाइल्सना पॅलेटवर लोड केलं जातं. प्लेनमधून पॅलेट पाडलं जातं. हवेत पॅलेट उघडत मिसाइल आपल्या टार्गेटच्या दिशेने झेपावतं.

या सिस्टिममुळे कुठल्याही खास मॉडिफिकेशनशिवाय शेकडो मिसाइल एकाचवेळी लॉन्च करता येऊ शकतात. इराण युद्धात Rapid Dragon चा वापर झालेला नाही. JASSM-ER ला थेट B-52, B-1B बॉम्बर विमानातून डागण्यात आलं आहे. Rapid Dragon वरुन कमी खर्चात हल्ला करता येतो.

इराणची मिसाइल आणि अणवस्त्र क्षमता संपवण्यावर ट्रम्प यांचा सर्व जोर आहे. JASSM-ER आणि GBU-72 सारख्या शस्त्रास्त्रांचा स्टॉक वेगाने संपतोय. त्यामुळे ARRW, Dark Eagle आणि Rapid Dragon सारखी शस्त्र वापरली जाऊ शकतात. ही शस्त्र फक्त घातकच नाहीत, तर शत्रुसाठी एक संदेश आहे, अमेरिकेकडे यापेक्षा पण शक्तीशाली पर्याय उपलब्ध आहेत.

 

Follow Us