AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran Israel Update : इराणी जनतेने आज रात्री 9 वाजता कुठे जाणं टाळावं हे इस्रायलने आधीच जाहीर केलं, महाविनाश घडवण्याआधी दिली सूचना

Iran Israel Update : डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेली डेडलाइन आज रात्री 8 वाजता संपणार आहे. त्यानंतर इराणची काय वाट लागेल हे कोणीच सांगू शकत नाही. त्यात आता इस्रायलने इराणी जनतेसाठी एक खास संदेश प्रसारीत केला आहे. स्थिती किती भयंकर आहे हेच यातून दिसून येतय.

Iran Israel Update : इराणी जनतेने आज रात्री 9 वाजता कुठे जाणं टाळावं हे इस्रायलने आधीच जाहीर केलं, महाविनाश घडवण्याआधी दिली सूचना
benjamin netanyahu
| Updated on: Apr 07, 2026 | 12:54 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेली 48 तासांची मुदत आज रात्री 8 वाजता संपणार आहे. त्यामुळे आज रात्री 8 नंतर इराणमध्ये काय घडणार? या बद्दल विविध अंदाज बांधले जात आहेत. मागच्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या युद्धातला आज निर्णायक दिवस ठरु शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच मंगळवार इराणमध्ये ऊर्जा प्रकल्प डे, ब्रिज डे असेल असं जाहीर केलं आहे. इराण अमेरिका-इस्रायलसाठी स्ट्रेट ऑफ हॉर्मुजचा जलमार्ग उघडायला तयार नाहीय. त्यामुळे ट्रम्प यांनी इराणला निर्वाणीचा इशारा दिला आहे. अमेरिकेकडून इराणच्या पायाभूत सेवा-सुविधा प्रकल्पांना लक्ष्य केलं जाऊ शकतं. इराणमध्ये ब्लॅक आऊट करण्याची धमकी आधीच दिली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा इराणसोबत आमची सकारात्मक चर्चा सुरु आहे असं सांगितलं. पण इराणने ट्रम्प यांचा दावा लगेचच फेटाळून लावला. असं काही सुरु नसल्याचं सांगितलं.

आता इराणला चर्चेच्या टेबलावर आणण्यासाठी अमेरिकेने टोकाच्या कारवाईची धमकी दिली आहे. पण इराण अजूनही ऐकायला तयार नाहीय. अमेरिकेची संभाव्य कारवाई रोखण्यासाठी स्टीव विटकॉफ यांची इराणी नेत्यांसोबत पडद्यामागे चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. स्टीव विटकॉफ हे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय आहेत. विशेष दूत स्टीव विटकॉफ आणि जेरेड कुशनर यांच्या नेतृत्वाखाली इराणसोबत चर्चा सुरु आहेत. या चर्चा अजून आमने-सामने भेटून बोलण्यापर्यंत आलेल्या नाहीत. त्यासाठी अमेरिकेने उपराष्ट्रपती जेडी वान्स यांना स्टँडबायवर ठेवलं आहे.

इस्रायलने इराणी जनतेला काय संदेश दिलाय?

सगळ्या जगात आत्ताच्या घडीला इराणमध्ये आज रात्री काय घडणार? हीच चर्चा आहे. या दरम्यान आता इस्रायलने खास फारसी भाषेत इराणी जनतेला आवाहन केलं आहे. इराणच्या स्थानिक वेळेनुसार मंगळवारी रात्री 9 वाजेपर्यंत ट्रेन्सचा वापर करु नका असा इस्रायलने इराणी जनतेला संदेश दिला आहे. “तुमच्या सुरक्षिततेसाठी आम्ही सांगतोय, इराणच्यावेळेनुसार रात्री 9 वाजेपर्यंत ट्रेन प्रवास टाळा” असं इस्रायली लष्कराने म्हटलं आहे. “तुम्ही ट्रेनमध्ये किंवा रेल्वे रुळाजवळ असाल तर तुम्ही तुमचं आयुष्य संकटात घालत आहात” असं सोशल मिडिया पोस्टमध्ये इस्रायलने म्हटलं आहे.

Follow Us
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....