AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाला 20 टक्के ऑक्सिजन देणाऱ्या अमेझॉन पर्जन्यवनात आगीचं रौद्ररुप

या आगीत (amazon rainforest fire) आतापर्यंत हजारो पक्षी, प्राणी आणि दुर्मिळ वनस्पती जळून खाक झाल्या आहेत. वातावरण बदलाशी तोंड देणाऱ्या विश्वासमोर हे गंभीर संकट (amazon rainforest fire) असल्याचं मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केलंय.

जगाला 20 टक्के ऑक्सिजन देणाऱ्या अमेझॉन पर्जन्यवनात आगीचं रौद्ररुप
| Edited By: | Updated on: Aug 22, 2019 | 5:13 PM
Share

ब्राझिलिया, ब्राझील : जगाचं फुफ्फुस म्हणून ओळख असलेल्या ब्राझीलमधील अमेझॉन पर्जन्यवनातील आगीने (amazon rainforest fire) रौद्ररुप धारण केलंय. दिवसेंदिवस ही आग आणखी भडकत आहे. विशेष म्हणजे या आगीत (amazon rainforest fire) आतापर्यंत हजारो पक्षी, प्राणी आणि दुर्मिळ वनस्पती जळून खाक झाल्या आहेत. वातावरण बदलाशी तोंड देणाऱ्या विश्वासमोर हे गंभीर संकट (amazon rainforest fire) असल्याचं मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केलंय.

ब्राझीलच्या अंतराळ संशोधन संस्थेने (आयएनपीई) 2013 मध्ये वनातील आगीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. तेव्हापासून मोठ्या प्रमाणात आगी नोंदवण्यात आल्या आहेत. आयएनपीईच्या माहितीनुसार, ब्राझीलमध्ये या वर्षात 72 हजार 843 आगीच्या घटना घडल्या. यापैकी निम्म्यापेक्षा जास्त घटना अमेझॉन प्रदेशात घडल्या. गेल्या वर्षी याच काळातील आगीच्या घटनांशी तुलना केली तर ही 80 टक्के वाढ आहे.

विश्वातील या सर्वात मोठ्या पर्जन्यवनामुळे जगासाठी 20 टक्के ऑक्सिजन निर्मिती केली जाते. त्यामुळे नैसर्गिक समतोल साधण्यासाठीही मोठा धोका निर्माण झालाय. अनेक पक्षी आणि प्राणी जळून खाक झाल्याची अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे प्रत्येकाचं हृदय हेलावून गेलंय.

युरोपियन युनियनच्या सॅटेलाईटने जारी केलेल्या फोटोनुसार, आगीचा धूर संपूर्ण अटलांटिक किनाऱ्यावर पसरलाय. तर धुराचं साम्राज्य ब्राझीलमधील निम्म्या भागात पसरलं असून शेजारील पेरु, बोलिविया आणि पेरुग्वेमध्येही धूर पसरत आहे.

अमेझॉन नदी दक्षिण अमेरिका खंडातील बहुतांश देशांना व्यापते. पण याचा दोन तृतीयांश भाग एकट्या ब्राझीलमध्ये आहे. आयएनपीईच्या माहितीनुसार, अमेझॉन पर्जन्यवनातील क्षेत्र प्रत्येक मिनिटाला नष्ट होत आहे.

ब्राझील सरकारवर दुर्लक्ष केल्याचा आरोप

पर्यावरणप्रेमी गेल्या अनेक वर्षांपासून अमेझॉन पर्जन्यवन वाचवण्यासाठी आंदोलन करत आहेत. पण ब्राझील सरकारने याकडे दुर्लक्ष करत वनतोडीसाठी परवानग्या दिल्या आणि कोणतीही उपाययोजना तयार केली नाही, असं पर्यावरणप्रेमींचं म्हणणं आहे. पर्यावरणप्रेमी आणि ब्राझील सरकारमध्ये आता आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. तर जगाची वनसंपत्ती नष्ट होत असल्यामुळे ब्राझील सरकारवर युरोपसह अनेक देशांनी टीका सुरु केली आहे.

अमेझॉन पर्जन्यवनाचं महत्त्व

  • जगाचं फुफ्फुस अशी ओळख असलेल्या अमेझॉन वनात जगातील एकूण 20 टक्के ऑक्सिजनची निर्मिती होते.
  • उष्णकटीबंधीय क्षेत्रातील हे सर्वात मोठं पर्जन्यवन आहे, जे 55 लाख चौरस फूट क्षेत्रात पसरलेलं आहे. दक्षिण अमेरिकेतील ब्राझील, बोलिविया, पेरु, इक्वॅडोर, कोलंबिया, व्हेनेझुएला, गयाना, सुरीनेम आणि फ्रेंच गयाना या देशांना लागून हे पर्जन्यवन आहे.
  • अमेझॉन वनाची परिसंस्था अत्यंत महत्त्वाची आहे, ज्यात वनस्पतींच्या 40 हजार पेक्षा जास्त जाती, पक्षांच्या 1300 प्रजाती, 3000 प्रकारचे मासे, 430 सस्तन प्राणी आणि तब्बल 25 लाख विविध किटकांचं अमेझॉन पर्जन्यवनात वास्तव्य आहे.
  • इलेक्ट्रिक इल्स, फ्लेश इटिंग पिरान्हास, विषारी बेडूक, जग्वार अशा हिंस्र प्राण्यांसह विविध विषारी सापांचं या वनात वास्तव्य आहे.
  • फक्त प्राणी आणि वनस्पतीच नव्हे, तर 400 ते 500 स्वदेशी अमेरिकन जमातींचं इथे वास्तव्य आहे.
  • अमेझॉन नदी प्रति सेकंदाला 55 दशलक्ष गॅलन पाणी अटलांटिक सागरात सोडते.
  • पश्चिमेकडून येणाऱ्या 25 टक्के औषधांमध्ये अमेझॉन पर्जन्यवनातील साहित्याचा वापर होतो. शास्त्रज्ञांनी अमेझॉनमध्ये अजून एक टक्केही वनस्पतींची चाचणी पूर्ण केलेली नाही. तरीही 25 टक्के औषधांना याचा फायदा होतो.

पर्जन्यवन म्हणजे काय?

अमेझॉन पर्जन्यवन हे अमेझॉन नदीच्या बाजूने पसरलेलं आहे, जिथे कायम पाऊस पडतो. सूर्याची किरणं न पसरणारंही क्षेत्र अमेझॉनमध्ये आहे. सतत पाऊस पडणाऱ्या वनाला पर्जन्यवन म्हणतात.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.