AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीन युद्धाला घाबरत नाही… अमेरिकेला थेट धमकी, जगात खळबळ, चीनने उचलले धक्कादायक पाऊल, अमेरिकेत…

डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून टॅरिफच्या मुद्द्यामध्ये संपूर्ण जगाला वेठीस धरताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर भला मोठा टॅरिफ लावल्याने एकच खळबळ उडाली आहे. दुसरीकडे चीन देखील अमेरिकेविरोधात मैदानात उतरलाय.

चीन युद्धाला घाबरत नाही... अमेरिकेला थेट धमकी, जगात खळबळ, चीनने उचलले धक्कादायक पाऊल, अमेरिकेत...
US China tariff dispute
| Updated on: Oct 12, 2025 | 12:26 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला मोठा धक्का देत तब्बल 100 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर काही आरोपही केली. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर चीन मैदानात उतरलाय. त्यांनी अमेरिकेवर थेट टीका देखील केली. चीनच्या अर्थमंत्रालयाच्या प्रवक्तांनी अमेरिकेने लावलेल्या टॅरिफबद्दल बोलताना म्हटले की, मुळात म्हणजे चीनला लढायचे नाहीये. मात्र, चीन युद्धाला घाबरत देखील नाही. आवश्यक असेल तर चीन मोठी कारवाई देखील करेल. चीनकडून एकप्रकारे हा अमेरिकेला मोठा इशारा देण्यात आला. अमेरिकेने चीनवर लावलेल्या टॅरिफमुळे भविष्यात मोठ्या घडामोडी घडण्याचे दाट संकेत आहेत.

अमेरिकेविरोधात चीनने घेतली थेट मोठी भूमिका 

अमेरिका प्रत्येक वेळी उच्च टॅरिफ लावण्याची भाषा चीनसोबत करतंय. चीनसोबतच्या वाटाघाटीमध्ये ही योग्य भाषा आणि मार्ग नसलयाचे चीनने स्पष्ट म्हटले. अमेरिकेला मोठे आवाहन करत चीनने म्हटले की, आम्ही अमेरिकेला त्यांच्या चुकीच्या पद्धती ताबडतोब दुरुस्त करण्याचे आणि स्थिर, निरोगी आणि विकासात्मक चीन-अमेरिका आर्थिक आणि व्यापारी संबंध राखण्याचे आवाहन करतो.

अमेरिकेला जाणाऱ्या जहाजांवर विशेष बंदर शुल्क आकारू

यादरम्यान चीनने म्हटले की, आम्ही अमेरिकेला जाणाऱ्या जहाजांवर विशेष बंदर शुल्क आकारू. अमेरिकेने आमच्यावर लादलेल्या टॅरिनंतर आम्हाला संरक्षणात्मक कारवाई म्हणून हे पाऊल उचलावे लागतंय. जर अमेरिका आपल्या भूमिकेवर ठाम राहिली तर चीन आपल्या कायदेशीर हक्कांचे आणि हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा थेट इशारा मंत्रालयाने अमेरिकेला दिला आहे.

1 नोव्हेंबर 2025 पासून चीनवर 100 टक्के टॅरिफ 

थोडक्यात काय तर आता चीन देखील अमेरिकेवर मोठा टॅरिफ लावण्याचा थेट विचार करताना दिसतोय. हेच नाही तर अमेरिकेत जाणाऱ्या जहाजांवर देखील ते कर आकारण्याच्या तयारीत आहेत. चीनने स्पष्टपणे अमेरिकेला धमकी दिली आहे. 1 नोव्हेंबर 2025 पासून चीनवर 100 टक्के टॅरिफ अमेरिका लावणार आहे. यामुळे दोन्ही देशातील व्यापार संबंध तणावात येण्याची दाट शक्यता आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?