AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांचा सर्वात मोठा वार, त्या प्लॅनमुळे इराणचं टेन्शन वाढलं, थेट कंगाल होणार?

या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी एका विशेष टीमला एक आदेश दिला आहे. या आदेशानंतर आता इराणने केलेल्या हल्ल्यांमुळे कोणकोणत्या आखाती देशांचे किती नुकसान झाले आहे, याचा अभ्यास केला जाणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा सर्वात मोठा वार, त्या प्लॅनमुळे इराणचं टेन्शन वाढलं, थेट कंगाल होणार?
donald trumpImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 07, 2026 | 4:50 PM
Share

America Iran War : अमेरिका आणि इराण यांच्यात सध्या शस्त्रसंधी झाली आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले करणे थांबवले आहे. हे युद्ध कायमचे थांबवण्यासाठी दोन्ही देशांकडून चर्चा सुरू आहे. परंतु अद्याप यात यश आलेले नाही. दरम्यान, आता अमेरिका मोठे पाऊल उचलण्याची शक्यता आहे. अमेरिकेकडून इराणची वेगळ्या पद्धतीने नाकेबंदी केली जाऊ शकते. इराणचा जो खजाना, संपत्ती आहे त्यावरच प्रहार करून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणला निष्प्रभ करण्याच्या प्रयत्नात आहेत.

नेमकी काय माहिती समोर आली आहे?

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात जेव्हा युद्ध सुरू झाले तेव्हा अमेरिकेला हतबल करण्यासाठी इराणे काही आखाती देशांवर हल्ले केले होते. ज्या देशांत अमेरिकेची लष्करी तळं होती, त्याच देशांना इराणने लक्ष्य केलं होतं. आता याच आखाती देशांचे नुकसान भरून काढण्यासाठी तसेच डागडुजी यासाठी अमेरिका इराणच्या गोठवलेल्या संपत्तीचा वापर करण्याची शक्यता आहे. त्यासाठी योजना तयार केली जात आहे. इराणने कुवैत आणि बहरीन या दोन देशांवर हल्ले केल्यानंतर या योजनेची अंमबलजावणी करण्याचा अमेरिकेकडून गांभीर्याने विचार केला जातोय. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

भविष्यात इराणने कोणताही हल्ला केला तर…

या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी एका विशेष टीमला एक आदेश दिला आहे. या आदेशानंतर आता इराणने केलेल्या हल्ल्यांमुळे कोणकोणत्या आखाती देशांचे किती नुकसान झाले आहे, याचा अभ्यास केला जाणार आहे. भविष्यात इराणने कोणताही हल्ला केला आणि त्या हल्ल्यात आखाती देशांचे नुकसान झाले तर ती नुकसान भरपाई इराणच्या संसाधनांच्या मदतीने कशी करता येईल, यावरही ही विशेष टीम अभ्यास करणार आहे.

इराण काय करणार?

दरम्यान, अमेरिकेने या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास सुरुवात केल्यास इराणला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अमेरिकेने हे पाऊल उचललेच तर इराण नेमकं काय करणार? इराणकडे काय पर्याय आहेत, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात