US Iran Update : हे अमेरिकाच करु शकते, दोन वैमानिकांना वाचवण्यासाठी किती हजार कोटी मोजले? शेवटी विषय प्रतिष्ठेचा होता

US Iran War Update : इराणने अमेरिकेचं F-15E फायटर जेट पाडलं. त्यानंतर अमेरिकेने एक मोठं रेस्क्यू ऑपरेशन राबवलं. अमेरिकेने आपल्या दोन्ही वैमानिकांना वाचवलं. पण यात अमेरिकेला सुद्धा मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. अमेरिकेने पायलट्सना वाचवण्यासाठी जो पैसा मोजला, तो आकडा वाचून तुमचे डोळे पांढरे होतील.

US Iran Update : हे अमेरिकाच करु शकते, दोन वैमानिकांना वाचवण्यासाठी किती हजार कोटी मोजले? शेवटी विषय प्रतिष्ठेचा होता
US Mission
Image Credit source: Getty Images
| Updated on: Apr 07, 2026 | 8:13 AM

अमेरिकेने नुकतचं इराणमध्ये अत्यंत कठीण मिलिट्री ऑपरेशन केलं. खरंतर अनेक देशांना यातून शिकण्यासारख बरचं काही आहे. अमेरिकेने हे ऑपरेशन करताना जगाला आपली सर्वोच्च लष्करी क्षमता दाखवून दिली. टेक्नोलॉजीचा खूप खुबीने वापर केला. 3 एप्रिल रोजी इराणने अमेरिकेच एक F-15 फायटर जेट पाडलं. इराणच्या इस्फहान प्रांतातील दक्षिण भागात ही घटना घडली. या विमानात दोन वैमानिक होते. इराणच्या भूमीवर अडकलेल्या आपल्या दोन वैमानिकांना बाहेर काढण्यासाठी अमेरिकेला खतरनाक रेस्क्यू ऑपरेशन करावं लागलं. एक पायलटला लवकर बाहेर काढलं. पण दुसऱ्या वैमानिकाला इराणच्या जाग्रोस पर्वत रांगांमध्ये 24 तासापेक्षा जास्त वेळ लपून रहावं लागलं.

अमेरिकेने आपल्या वैमानिकांच्या बचाव मोहिमेत अत्यंत अत्याधुनिक विमानं आणि शस्त्रांचा वापर केला. यात A-10 थंडरबोल्ट II जेट, C-130 हरक्यूलिस, MC-130J कमांडो II विमान, ब्लॅक हॉक हॅलिकॉप्टर आणि MQ-9 रीपर ड्रोन यांचा वापर केला. ड्रोनच्या मदतीने बेपत्ता अधिकाऱ्याचं लोकेशन शोधून काढलं व तिथे आसपास काय-काय धोके आहेत, त्याची माहिती मिळवली. रात्रीच्या अंधारात स्पेशल फोर्सची टीम तिथे दाखल झाली. अमेरिकी सैन्याने बॉम्बफेक आणि फायरिंग करुन इराणी सैनिकांना जाग्रोस पर्वत रांगांपर्यंत पोहोचू दिलं नाही. तिथे वैमानिक लपला होता. एलिट कमांडो फोर्सला आपलं मिशन राबवताना अडचणी येऊ नयेत हा त्यामागे उद्देश होता. MQ-9 रीपर ड्रोनद्वारे जे लोक पायलटच्या लोकेशनच्या जवळ होते, त्यांच्यावर हल्ला केला.

या विमानांची, हॅलिकॉप्टरची किंमत किती?

अमेरिकेचं ऑपरेशन यशस्वी झालं. दुसऱ्या वैमानिकाला वाचवण्यात आलं. पण त्यात अमेरिकेचं सुद्धा नुकसान झालं. मिशन संपल्यानंतर परतीला निघताना दोन MC-130J विमान टेकऑफ करण्याच्या स्थितीमध्ये नव्हती. ही खूप महागडी विमानं होती. एका विमानाची किंमत 100 मिलियन डॉलर जवळपास 930 कोटी रुपये आहे. ही विमानं शत्रुच्या हाती लागू नये म्हणून अमेरिकेनेच ती विमानं नष्ट केली. त्याशिवाय दोन MH-6 लिटिल बर्ड हॅलिकॉप्टर सुद्धा नष्ट केली. एका हॅलिकॉप्टरची किंमत 7.5 मिलियन डॉलर जवळपास 69.78 रुपये आहे.

500 मिलियन डॉलर म्हणजे किती हजार कोटी?

इराणने सुद्धा काही MQ-9 रीपर ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. त्याची किंमत 30 ते 60 मिलियन डॉलर म्हणजे 279 कोटी ते 558 कोटी रुपयापर्यंत आहे. पण अमेरिकेने इराणच्या दाव्याची पृष्टी केलेली नाही. या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये एका वैमानिकाला वाचवण्यासाठी 500 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 4,652 कोटी रुपयांच्या आसपास खर्च झाला आहे.

Follow Us