AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भीषण अपघात! धावपट्टीवरून विमान कोसळलं, 5 जणांचा मृत्यू

अमेरिकेत मोठी विमान दुर्घटना घडल्याचे समोर आलं आहे. या विमान अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

भीषण अपघात! धावपट्टीवरून विमान कोसळलं, 5 जणांचा मृत्यू
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 07, 2026 | 7:43 AM
Share

अमेरिकेमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. फ्लोरिडाच्या मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवरून विमान कोसळून दुर्घटना घडली. धावपट्टीवरून घसरून पुढे गेल्यानंतर विमानाला आग लागली. त्यानंतर धावपट्टीजवळ उभ्या वाहनांना विमानाने धडक दिली. या अपघाताच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. अपघातानंतर अमेरिकेतील विमान सेवा विस्कळीत झाली आहे.

विमानाने धावपट्टी जवळ उभ्या असलेल्या अनेक वाहनांना धडक दिली. त्यानंतर विमानाला आग लागली. विमानातून धूर देखील निघू लागला. विमानाला आग लागल्याच्या घटनेनंतर विमानतळावरील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. दुर्घटनेनंतर सर्व धावपट्टी आणि टॅक्सीवे सेवा बंद करण्यात आली. विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ही घटना रविवारी दुपारी 2 वाजता घडली. विमान दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. तर दोन जण किरकोळ जखमी झाले असून सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अग्निशमन दलाच्या प्रमुखांनी सांगितलं की, दुर्घटनेनंतर आकाशात काळे धुराचे लोट पसरू लागले. त्यानंतर पायलट- सह पायलट कॉकपिटमध्ये अडकले. तर काही जण धावपट्टीजवळील कारमध्ये अडकले होते. तर एक जण गाडीच्या खाली दबला गेला होता. विमानतळावरून दुर्घटनेनंतर सर्व विमान सेवा थांबवण्यात आली. विमानाची दुर्घटना घडल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचं पथक तातडीने घटनास्थळी पोहोचलं. त्यांनी विमानाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले.

मालवाहू कंपनीद्वारे हे विमान चालवले जात होते. 32 वर्ष जुनं बोइंग विमान हे प्रवाशांची ये-जा करण्यासाठी वापरलं जात होतं. विमान हे 2015 साली मालवाहू करण्याआधी दोन दशकांहून अधिक काळ प्रवाशांच्या सेवेत होते. कंपनीने म्हटलं की, मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडलेल्या दुर्घटनेने दु:ख झालं. या विमानतळ दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या नातेवाईंकाप्रती संवेदना व्यक्त करतो. अपघातात 5 जणांच्या मृत्यूने मोठं नुकसान झालं आहे. विमानतळाबाहेर इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान चालवणाऱ्या जॅक्सनने म्हटलं की, विमान दुर्घटना घडत असताना दुसरीकडे मी 4 मित्रांसोबत रस्त्यावर होतो. मला विमानतळ परिसरात आकाशात धुराचे लोट पसरताना दिसत होते. आम्ही प्रत्येक पाच मिनिटाला विमानाच्या उड्डाणाचा आवाज ऐकत असतो. मी नेहमीसारखा आवाज ऐकला. परंतु दुर्घटनेनंतर घटनास्थळी पोहोचल्यानंतर घटनेची संपूर्ण माहिती मिळाली. हा अपघात नेमका कसा घडला, याची माहिती घेण्याचे काम विमानतळ प्रशासनाकडून घेतले जात आहे

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?