Donald Trump : अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी ठरवलं, इराणविरोधात थेट…सर्वात मोठ्या निर्णयाने जगात खळबळ!

सध्या इराण आणि अमेरिका यांच्यातील वादाने जगाचे लक्ष वेधले आहे. असे असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळच्या सहकाऱ्याने इराविरोधात लवकरच मोठा निर्णय घेण्यात येऊ शकतो, असे सांगितले आहे.

Donald Trump : अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी ठरवलं, इराणविरोधात थेट...सर्वात मोठ्या निर्णयाने जगात खळबळ!
donald trump ayatollah ali khamenei
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 17, 2026 | 3:14 PM

America And Israel Clash : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून इराणविरोधात कठोर भूमिका घेताना दिसत आहेत. इराणधील सत्ता उलथवून लावण्याचा त्यांचा मनसूबा असल्याचे सांगितले जात आहे. अनेकवेळा ट्रम्प यांनी तशा प्रकारच्या दमक्यादेखील दिल्या आहेत. ट्रम्प यांच्या इराणविरोधी भूमिकेनंतर अमेरिकेने इराणच्या विरोधात सैन्यदेखील तैनात केलेले आहे. असे असतानाच आता जगात खळबळ उडवून देणारी माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या काही आठवड्यात अमेरिका इराणविरोधात मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे. तसे संकेत ट्रम्प यांच्या पक्षाच्या एका खासदाराने दिले आहेत. त्यामुळे आता भविष्यात काहीतरी मोठं घडणार असल्याचं बोललं जात आहे.

नेमकी काय माहिती समोर आली आहे?

मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकन सिनेटर लिंड्से ग्रॅहम यांनी इस्रायलच्या दौऱ्यावर असताना इराणविषयी महत्त्वाचे भाष्य केले आहे. तेल अविव येथे असताना इराणविषयी आता लवकरच मोठा निर्णय होऊ शकतो, असं विधान केलं आहे. सोबतच या निर्णयासाठी काही महिने नव्हे तर काही आठवडे लागू शकतात. म्हणजेच इराणविरोधात लवकरच एखादा मोठा निर्णय होऊ शकतो. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांची सत्ते लवकरात लवकर जाणे आवश्यक आहे, असे विधानही त्यांनी केले. ग्रॅहम हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळचे आणि विश्वासू नेते मानले जातात. ते रिपब्लिकन पार्टीचे नेते आहेत.

एकीकडे वाद सोडवण्यासाठी चर्चा तर दुसरीकडे…

अमेरिका आणि इराण यांच्यात चालू असलेला वाद मिटवण्यासाठी राजनकीय चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातो आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून ओमान येथे अमेरिका आणि इराणची बैठक झाली होती. आता पुढच्या आठवड्यात आणखी एक बैठक होणार आहे. एकीकडे वाद मिटवण्यासाठी चर्चा चालू असताना दुसरीकडे ग्रॅहम यांनी इराणविरोधात मोठा निर्णय होऊ शकतो, असे सांगितल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

भविष्यात काय होणार?

ग्रॅहम यांनी केलेल्या विधानामुळे आता अमेरिका इराणबाबत गांभीर्याने विचार करत असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. इराणच्या धोरणाबाबत अमेरिका आणि इस्रायल एकमेकांच्या सोबत आहेत. त्यामुळे आता भविष्यात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.