AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रम्प यांच्यावर अमेरिकन जनतेची खप्पामर्जी?, किती टक्के लोकांना सरकार वाटतंय भ्रष्ट, वाचा

गॅलप च्या नव्या सर्वेक्षणानुसार सुमार १० पैकी ९ अमेरिकन मानतात की अमेरिकन सरकारात भ्रष्टाचार व्यापक आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसच्या दुसऱ्या इनिंगनंतर हा आकडा सर्वोच्च स्तरावर पोहचला आहे.

ट्रम्प यांच्यावर अमेरिकन जनतेची खप्पामर्जी?, किती टक्के लोकांना सरकार वाटतंय भ्रष्ट, वाचा
donald Trump
| Updated on: Sep 03, 2026 | 4:49 PM
Share

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांची दुसरी टर्म सुरु आहे. एकीकडे अमेरिका आणि इस्रायल यांचे इराणशी युद्ध सुरु आहे. तर दुसरीकडे एका सर्वेक्षणात ८९ टक्के अमेरिकन नागरिक अमेरिकेत भ्रष्टाचार व्यापक प्रमाणात पसरला असल्याचे म्हटले जात आहे. हा आकडा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये आल्यानंतर दोन दशकाच्या सर्वोच्च पातळीवर पोहचला आहे. गेल्यावर्षी ७९ टक्के आणि २०२४ मध्ये ७३ टक्के होता. सर्वेनुसार सुमारे १० पैकी ९ नागरिकांची धारणा बनली आहे की डेमोक्रेट आणि अपक्ष मतदारांची संख्या वेगाने वाढली आहे.

सर्वेमध्ये अमेरिकन लोकांनी काय म्हटले ?

या सर्वेक्षणात ८९ टक्के अमेरिकन नागरिकांनी म्हटले आहे की अमेरिकेत भ्रष्टाचार व्यापक रुपाने पसरला आहे. हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत १० टक्क्यांहून अधिक आहे. आणि २०२४ च्या ७३ टक्क्यांहून अधिक आहे. साल २०१० ते २०२५ दरम्यान हा आकडा सर्वसाधारणपणे ७२ ते ७९ टक्क्यांदरम्यान राहिला आहे. सर्वेक्षणानुसार ही वाढ डेमोक्रेट मतदारांमध्ये सर्वात जास्त पाहायला मिळाली आहे.

साल २०२४ मध्ये ५७ टक्के डेमोक्रेट सरकारमध्ये व्यापक भ्रष्टाचार मानत होते. मात्र, आता हा आकडा ९१ टक्के झाला आहे. अपक्ष मतदारांमध्ये ही टक्केवारी ७८ ने वाढून ९० झाला आहे. रिपब्लिकनमध्ये हा आकडा अपेक्षापेक्षा स्थिर राहीला आणि या वर्षी सुमारे ८३ टक्के राहीला. प्रश्नात ट्रम्प यांचे नाव थेट घेतले नव्हते, परंतू गॅलप या संस्थेनुसार व्यापक भ्रष्टाचार असल्याचे सांगणाऱ्यांची संख्येत वाढ त्यांच्या सत्तेत परतल्यानंतर झाली आहे.

गॅलपच्या सर्वेक्षणानुसार ७१ टक्के लोकांनी म्हटले की अमेरिकन व्यापार जगात देखील भ्रष्टाचार व्यापक आहे, जो २०२४ मध्ये ५९ टक्के होता. ८९ टक्क्यांचा आकडा अमेरिकेला त्या निवडक देशांच्या श्रेणीत ठेवत आहे. जेथे एवढी मोठी संख्येने लोक आपल्या सरकारामध्ये व्यापक भ्रष्टाचार पाहातात. गॅलपच्या अनुसार २०२३ नंतर केवळ लेबनॉन, घाना, नायजेरिया आणि पेरुमध्ये एवढा उच्च स्तर दर्ज केला गेला आहे.

ट्रम्प आणि भ्रष्टाचाराचे आरोप

हा सर्वेक्षण अहवाल अशा वेळी आला आहे, जेव्हा व्हाईट हाऊसमध्ये परतल्यापासून ट्रम्प यांना संभाव्य हितसंबंधांचा संघर्ष आणि सत्तेचा गैरवापर यांसंबंधी अनेक आरोप आणि वादांना सामोरे जावे लागले आहे. असाच एक वाद कतारच्या राजघराण्याने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना भेट दिलेल्या अत्यंत आलिशान बोईंग ७४७ विमानाशी संबंधित होता.

ट्रम्प यांनी या विमानाचे वर्णन अमेरिकेला मिळालेली एक विनामूल्य भेट असे केले, तर अमेरिकेच्या हवाई दलाच्या माजी अधिकाऱ्यांच्या मते, ‘एअर फोर्स वन’ म्हणून वापरण्यापूर्वी करदात्यांच्या पैशातून लाखो डॉलर्सच्या सुधारणांची आवश्यकता भासू शकते. या मुद्द्यावरून रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट या दोन्ही पक्षांकडून टीका झाली असून, ट्रम्प यांचे अध्यक्षपद, त्यांचे व्यावसायिक हितसंबंध आणि श्रीमंत परदेशी देणगीदार यांच्यातील संबंधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा