
स्ट्रेट ऑफ होर्मुज जगातील कच्चा तेलाच्या पुरवठ्याचा महत्वाचा मार्ग आहे. बुधवारी स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये तीन हल्ले झाले. एका हल्ल्यानंतर कार्गो शिपला आग लागली. या अरुंद समुद्र मार्गावर जहाजाला आगीच्या ज्वाळांनी वेढलं. युनाइटेड किंगडम मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन्सच्या रिपोर्टनुसार स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये मालवाहू जहाजांना टार्गेट करण्याच्या तीन घटना घडल्या. यात अज्ञात प्रोजेक्टाइलद्वारे हल्ला केला. एपीच्या रिपोर्टनुसार बुधवारी स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये एका मालवाहू जहाजाला प्रोजेक्टाइल धडकलं. त्याने आग भडकली. होर्मुज स्ट्रेट समुद्राची रुंदी 33 किलोमीटर आहे. यात ऑपरेशनल हिस्सा 11 किलोमीटरचा असून तिथून जहाजं ये-जा करु शकतात. समुद्राच्या बाकीच्या भागात खोली कमी आहे. तिथून मोठी जहाजं जाऊ शकत नाहीत.
म्हणून स्ट्रेट ऑफ होर्मुज खतरनाक आहे. ताज्या हल्ल्यांमुळे तेल संकट अजून गंभीर होऊ शकतं. मागच्या 72 तासात म्हणजे तीन दिवसात या मार्गावरुन अन्य देशांचे फक्त दोन टँकर या मार्गावरुन गेले आहेत. युनायटेड किंगडम मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन्सनुसार 11 मार्चला तीन शिपवर हल्ला करण्यात आला.
अज्ञात प्रोजेक्टाइलने हल्ला
हॉर्मुज स्ट्रेटमध्ये ओमानच्या उत्तरेला जहाजावर हल्ला झाला. या जहाजातून क्रू सदस्यांना बाहेर काढण्यात आलं. जहाज समुद्रात आगीमध्ये धगधगतय. ब्रिटिश मिलिट्रीकडून संचलित होणाऱ्या यूनायटेड किंगडम मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन्स सेंटरने ही माहिती दिली. इराणने तात्काळ हल्ल्याची जबाबदारी घेतली नाही. ते स्ट्रेट आणि आसपासच्या मार्गावरुन जाणाऱ्या जहाजांना लक्ष्य करतायत. तेल आणि नैसर्गिक गॅसच्या एकूण व्यापाराचा पाचवा हिस्सा इतकी वाहतूक या भागातून होते. 11 मार्च 2026 च्या सकाळी भारतीय वेळेनुसार 7:28 मिनिटांनी स्ट्रेट ऑफ होरमुजमध्ये एका कंटेनरवर अज्ञात प्रोजेक्टाइलने हल्ला झाला.
तीन दिवसात आतापर्यंत किती टँकर्सनी होर्मुज स्ट्रेट क्रॉस केलय?
11 मार्च 2026 रोजी सकाळी यूके एमटीओने एक रिपोर्ट जारी केला. त्यानुसार दुबईपासून 50 नॉटिकल मैल म्हणजे जवळपास 93 किलोमीटर उत्तर-पश्चिमेला कार्गो जहाजावर अज्ञात प्रोजेक्टाइलद्वारे हल्ला झाला. यात जहाजाचं नुकसान झालं. पण पर्यावरणावर काही परिणाम झाला नाही. सर्व क्रू सदस्य सुरक्षित आहेत. AFP ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, 8 मार्चपासून आतापर्यंत 72 तासात 7 तेल टँकर्सनी होर्मुज स्ट्रेट क्रॉस केलय. यात इराणी कार्गोशी संबंधित 5 जहाजं आहेत.
भारताचा किती टक्के LPG स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून येतो?
हॉर्मुज स्ट्रेटमध्ये मालवाहू जहाजांवर हल्ला होणं ही भारतासाठी अत्यंत वाईट बातमी आहे. कारण आधीच तेल आणि घरगुती वापराच्या LPG गॅसच्या कमतरतेचे पडसाद भारतात उमटायला सुरुवात झालेली आहे. जगातील 20 टक्के कच्चा तेलाची वाहतूक स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून होते. भारताचा जवळपास 80 टक्के एलपीजी याच स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून येतो. आज जहाजांवर असे हल्ले झाले असतील, तर आता या मार्गावरुन मालवाहतुकीचा धोका अन्य कार्गोशिप पत्करणार नाहीत.