Iran Israel War : अखेर जे नको होतं तेच घडलं! युद्धाची ती भविष्यवाणी ठरली खरी; काय होतं हादरवणारं भाकित?

सध्या आखाती देशांत युद्धाग्नी भडकलेला आहे. इस्त्रायलकडून इराणवर हल्ले केले जात आहेत. इराणदेखील इस्रायलवर क्षेपणास्त्र डागत आहे. असे असतानाच आता एका जुन्या भविष्यवाणीची चर्चा होत आहे.

Iran Israel War : अखेर जे नको होतं तेच घडलं! युद्धाची ती भविष्यवाणी ठरली खरी; काय होतं हादरवणारं भाकित?
baba vanga war prediction
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 02, 2026 | 9:43 PM

Baba Vanga Predictions : इस्त्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जग आता तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन उभे आहे. इस्रायलक तसेच अमेरिकेकडून इराणवर हादरवून टाकणारे हल्ले केले जात आहेत. तर दुसरीकडे इराणदेखील माघार घेण्यास तयार नसून इस्रायलमधील महत्त्वाची ठिकाणं तसेच आखाती देशांतील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले करत आहेत. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. याच युद्धात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई हेदेखील मृत्युमुखी पडले आहेत. या सर्व घडामोडी घडत असताना आता बाबा वेंगा यांच्या केलेल्या भविष्यवाणीची नव्याने चर्चा होत आहे. त्यांची भविष्यवाणी खरी ठरत आहे, असे म्हटले जात आहे.

बाबा वेंगा यांनी काय भविष्यवाणी केली होती?

बाबा वेंगा आज हयात नसल्या तरीही त्यांनी पुढच्या अनेक वर्षांतील भविष्यवाणी करून टेवलेली आहे. 1996 सालीच बाबा वेंगा यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांच्या समर्थकांच्या दाव्यानुसार मृत्यूआधी बाबा वेंगा यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगून टेवल्या होत्या. त्यांनी युद्धाबाबत अशीच एक भविष्यवाणी केली होती. 2020 सालानंतर जगात राजनयीक तणाव वाढेल. वेगवेगळ्या देशांतील हाच तणाव नंतर युद्धात बदलेल, असे भाकित बाबा वेंगा यांनी करून ठेवले होते, असा दावा केला जातो.

सध्या जगात कुठे-कुठे संघर्ष चालू आहे?

जगात अनेक देशांमध्ये सध्या संघर्षाची स्थिती आहे. गेल्या चार वर्षांपासून युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध चालू आहे. हे युद्ध अजूनही मिटलेले नाही. दुसरीकडे आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या शेजारी राष्ट्रांमध्ये संघर्ष चालू झाला आहे. हे दोन्ही देश एकमेकांवर मोठे हल्ले करत आहेत. आता इराण-इस्रायल यांच्यातही युद्धाग्नी भडकला आहे. इराणवर अमेरिकेनेही हल्ले केले आहेत. या युद्धात आता काही मुस्लीम राष्ट्रदेखील सामील होण्याची शक्यता आहे.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Follow Us