AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran Israel War : इराणचे हाल पाहून आता चीन मैदानात, अमेरिका-इस्रायलला थेट…ड्रॅगनच्या डरकाळीने खळबळ!

इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध चालू आहे. याच युद्धावर आता चीनने आपली भूमिका जाहीर केली आहे. चीनच्या भूमिकेनंतर आता काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Iran Israel War : इराणचे हाल पाहून आता चीन मैदानात, अमेरिका-इस्रायलला थेट...ड्रॅगनच्या डरकाळीने खळबळ!
iran and israel war china commentImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 02, 2026 | 6:51 PM
Share

Iran Israel War : इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस वाढतच आहे. इस्रायलकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यांना इराण जशास तसे प्रत्युत्तर देत आहे. इराणने अनेक आखाती देशांतील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले केले आहेत. त्यामुळे अमेरिकादेखील चांगलाच भडकला आहे. इराणने शस्त्र टाकावेत अन्यथा आम्ही आतापर्यंत कधीही न केलेला हल्ला करू, असा इशाराच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला आहे. असे असतानाच आता चीनने या युद्धाबाबत मोठी भूमिका घेतली आहे. या भूमिकेनंतर आता भविष्यात काय होणार? याचा धसका जगाने घेतला आहे.

चीनची नेमकी भूमिका काय?

चीनने इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धावर प्रतिक्रिया दिली आहे. या देशाने चीन, अमेरिका -इस्रायलने युद्ध थांबवावे असे आवाहन केले आहे. “इराणच्या सर्वोच्च नेत्यावर हल्ला करणे, त्या नेत्याची हत्या करणे हे इराणचे सार्वभौमत्त्व आणि सुरक्षेचं उल्लंघन आहे. हे कृत्य संयुक्त राष्ट्राचा उद्देश, सिद्धांत, आंतरराष्ट्रीय संबंधाच्या मूलभूत मानकांचे उल्लंघन आहे,” असे चीनने म्हटले आहे.

लष्करी कारवाया लवकरात लवकर थांबवाव्यात अन्यथा…

चीन या हल्ल्याचा विरोध करतो. तसेच या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. लष्कराकडून केल्या जात असलेल्या कारवाईला तत्काळ थांबवावे. मध्य-पूर्वेतील तणाव कमी व्हावा, शांतता नांदावी यासाठी सर्वांना मिळून प्रयत्न करावे असे आवाहनही आम्ही करतो’ अशी भूमिकाही चीनने घेतली आहे. चीनकडून इराणने काही क्षेपणास्त्र खरेदी केले आहेत, असा दवा केला जात होता. हा दावाही चीनने खोडून काढला आहे. तसा कोणताही व्यवहार झालेला नाही, असे चीनने सांगितले आहे.

भारताला नेमका काय फटका बसणार?

दरम्यान, मध्य पूर्वेतील तणावामुळे एका प्रकारे जगच संकटात सापडले आहे. इंधन, नैसर्गिक वायूच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे युद्ध जास्त दिवस लांबले तर भारतालाही त्याचा फटका बसू शकतो. कारण भारत संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, कुवैत यासारख्या देशांकडून इंधन मोठ्या प्रमाणात खरेदी करतो. हे प्रमाण 80 ते 90 टक्के आहे. असे असताना चीनने इराणवरील हल्ल्याचा निषेध केल्यानंतर नेमकं काय घडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...