AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक! थेट इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयावर मिसाईल डागल्या, इराणच्या सर्वात भयंकर हल्ल्याने खळबळ!

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धात मोठी जीवितहानी होत आहे. अनेक इमारती उद्ध्वस्त होत आहेत. असे असतानाच आता इराणने इस्रायलवर सर्वात मोठा हल्ला केल्याचे म्हटले जात आहे.

धक्कादायक! थेट इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयावर मिसाईल डागल्या, इराणच्या सर्वात भयंकर हल्ल्याने खळबळ!
benjamin netanyahuImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 02, 2026 | 7:05 PM
Share

America Israel War Update : इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाचा भडका उडाला आहे. इस्त्रायल, अमेरिका यांच्याकडून इराणवर मोठे हल्ले केले जात आहे. या हल्ल्यांमध्ये इराणच्या अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर इराणदेखील प्रत्युत्तरादाखल इस्रायलवर हल्ले करत आहे. इराणने आखाती देशांमधील काही अमेरिकन लष्करी तळांनाही लक्ष्य केलं आहे. अमेरिकेकडून तर इराणला थेट धमकी देण्यात आलेली आहे. इराणने आमच्यावर हल्ले केले तर याआधी कधीही न केलेला असा हल्ला आम्ही करू, अशी थेट धमकीच अमरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल आहे. असे असतानाच आता जगात खळबळ उडवणारी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार इराणने इस्रायलचे प्रमुख बेन्यामीन नेतान्याहू यांच्या कार्यालयावरच क्षेपणास्त्र डागले आहेत.

कमांडरच्या कार्यालयावरही हल्ला

या युद्धाला आता आणखी धार चढली आहे. त्यामुळे मध्य-पूर्वेतील तणाव तर वाढलाच आहे, परंतु या संघर्षाचा संपूर्ण जगाने धसका घेतला आहे. आता ताज्या माहितीनुसार इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) इस्रायलमधील तेल अवीव या शहरातील नेतान्याहू यांच्या कार्यालयालच लक्ष्य केलं आहे. यासह इराणने इस्रायलच्या वायूसेना कमांडरच्या कार्यालयावरही क्षेपणास्त्र डागण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर आता सगळीकडेच खळबळ उडाली आहे. बेन्यामीन नेतान्याहू सध्या कोणत्या स्थितीत आहे, याबाबत सध्यातरी अस्पष्टता आहे, असे IRGC ने सांगितलेे आहे.

हल्ला झालेलाच नाही

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा या युद्धात मृत्यू झाल्यानंतर इराणने हा हल्ला केला आहे. परंतु इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामीन नेतान्याहू यांच्या कार्यालयावर हल्लाच झालेला नाही, असे इस्रायलकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, इराणने आपले शस्त्र टाकून द्यावेत, असा इशारा अमेरिकेने दिलेल आहे. सोबतच इराणने युद्धातून माघार घेतल्यास आम्ही त्यांना सुरक्षेची हमी देऊ, असे आश्वासनही अमेरिकेने दिले आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय काय होणार? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. सध्यातरी भारतात सोने आणि चांदीचा भाव वाढताना दिसत आहे. इंधनाच्या कमितीतही वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...