AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran War: युद्ध आणखी पेटणार! 3 देशांकडून इराणला इशारा, हल्ले न थांबवल्यास…

Iran War: गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इस्त्रायल हे इराणवर हल्ला करताना दिसत आहेत. हल्ल्याची सुरुवात ही इस्त्रायलने इराणवर हल्ले करत केली. आता या युद्धात आणखी तीन देशांनी उडी मारली आहे. त्यांनी थेट इराणला इशाला दिला आहे.

Iran War: युद्ध आणखी पेटणार! 3 देशांकडून इराणला इशारा, हल्ले न थांबवल्यास...
Iran WarImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 02, 2026 | 4:30 PM
Share

इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील भडकलेले युद्ध थांबण्याचे नाव घेत नाहीये. हे युद्ध आता अतिशय हिंसक पातळीला पोहोचल्याचे चित्र आहे. इस्त्रायलने अमेरिकेच्या मदतीने केलेल्या हल्ल्याचे प्रतिउत्तर देण्यासाठी इराणने आखाती देशामधील अमेरिकेचे लष्करी तळ उद्धवस्त केले. इराणने अक्षरश: अंधाधुंद हल्ला करण्यास सुरुवात केली होती. आता हा हल्ला पाहून तीन देशांनी इराणला इशारा दिला आहे. त्यांनी हल्ले थांबले नाही तर… आता हे देश कोणते आहेत? आणि त्यांनी नेमका काय इशारा दिला? चला जाणून घेऊया…

कोणते तीन देश?

इराणच्या अंधाधुंद हल्ल्यांमुळे फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटनकडून संयुक्त निवेदन जारी करण्यात आले आहे. या तीनही देशांनी हल्ले त्वरीत थांबवण्याचा सल्ला दिला आहे. अन्यथा इराणविरोधात ‘डिफेंसिव अॅक्शन’ घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. इराणने काही देशांमधील अमेरिकेचे लष्करी तळ उद्धवस्त करण्यासाठी ड्रोन हल्ले केले. हे हल्ले अंधाधुंद असल्यामुळे इतर गोष्टींचेही नुकसान होत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता या युद्धात तीन नव्या देशांनी उडी घेतली आहे.

इराणचा नवा दावा काय आहे?

अमेरिका आणि इस्त्रायलने इराणच्या नतांज न्यूक्लियर सुविधेवर (Natanz Nuclear Facility) हल्ला केला आहे. या हल्लानंतर जगात खळबळ माजली आहे. याचा हल्लामुळे आता रेडिएशनचा धोका निर्माण झाला आहे. अंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा एजन्सीचे (IAEA) महासंचालक राफेल ग्रॉसी यांनी अमेरिका आणि इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर चिंता व्यक्त केली आहे. या घटनेमुळे रेडियोलॉजिकल रिलीज (रेडिएशन लीक) होण्याची शक्यता नाकारता येत नाही, ज्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. यामुळे मोठी शहरे रिकामी करण्याची वेळ येऊ शकते. त्यांनी सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे आणि कूटनीतिक मार्गाने चर्चा करण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या ४८ तासांतच ४८ प्रमुख इराणी नेते आणि ४० महत्त्वाचे लष्करी कमांडर ठार मारल्याचा दावा करण्यात येत आहे. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर आता इस्त्रालय आणि अमेरिकेने इराणविरुद्ध बंड पुकारले आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...