AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! 147 प्रवासी असलेलं विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न, मोठी खळबळ, थेट पायलटच्या…

मोठी बातमी समोर आली आहे. विमानातीलच एका प्रवाशाकडून विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न झाला. मात्र पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून, या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे.

मोठी बातमी! 147 प्रवासी असलेलं विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न, मोठी खळबळ, थेट पायलटच्या...
विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 31, 2026 | 5:00 PM
Share

अमेरिकेमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विमानाच्या उड्डाणानंतर एका प्रवाशानं कथितरित्या विमानाच्या कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली. युनायडेड एअरलाइन्सच्या एका विमानात हा प्रकार घडला आहे. हे विमान शिकागोवरून मिनियापोलीसला जात होतं. या धक्कादायक प्रकारानंतर सुरक्षेची खबरदारी म्हणून हे विमान मध्येच विस्कॅन्सिनच्या मॅडिसन एअरपोर्टवर लँड करण्यात आलं. रिपोर्टनुसार बोइंग 737 विमानाने शुक्रवारी रात्री शिकागोच्या ओ हेयर इंटरनॅशनल विमानतळावरून टेक ऑफ केलं होतं. या विमानात 147 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर होते. मात्र अचानक असा प्रकार घडल्यानं प्रवाशांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं. हे विमान मध्येच उतरवण्यात आलं, तसेच या प्रवाशाला देखील अटक करण्यात आली आहे.

एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या ऑडिओ रेकॉर्डिंगनुसार विमान पायलटने याची माहिती कंट्रोल रूमला देताना सांगितलं की विमानात असलेल्या अधिकाऱ्यांनी एका प्रवाशाला ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर हे विमान मध्येच विस्कॅन्सिनच्या मॅडिसन एअरपोर्टवर लँड करण्यात आलं. या विमानतळावर ताब्यात घेण्यात आलेल्या प्रवाशाला विमानातून खाली उतरवण्यात आलं, दरम्यान तिथे आधीच पोलीस हजर होते, पोलिसांनी या प्रवाशाला ताब्यात घेतलं असून, त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या घटनेचं गांभीर्य प्रवाशांच्या तेव्हा लक्षात आलं, जेव्हा पायलट आणि क्रू मेंबर यांच्याकडून 7500 हा कोड सक्रिय करण्यात आला. हा कोड तेव्हाच सक्रिय करण्यात येतो जेव्हा पायलटला विमान हायजॅक झालं आहे, किंवा होणार आहे, अशी भिती वाटते. हा कोड सक्रिय करताच प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ उडाला. समोर आलेल्या माहितीनुसार या प्रवाशाने अनेकदा विमानाच्या कॉकपीटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. शेवटी या प्रवाशाला अटक करण्यात आल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. या घटनेनं काही काळ मात्र चांगलाच गोंधळ उडाला होता. या प्रवाशाचा नेमका उद्देश काय होता? हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाहीये. पोलीस तपास सुरू आहे.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार