AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pralay Missile : भारताकडून हवेत दिशा बदलणारं घातक मिसाइल विकत घेऊन हा देश करतोय युद्धातील पराभवाचा बदला घेण्याची तयारी

Pralay Missile : चार वर्षांपूर्वी झालेल्या युद्धात या देशाचा पराभव झाला होता. त्यामुळे त्या देशाचे सैन्य रणनितीकार हवेत दिशा बदलू शकणाऱ्या मिसाइलचा शोध घेत होते. अशा मिसाइल्सना ट्रॅक करणं शत्रुच्या रडारसाठी खूप कठीण असतं. पाकिस्तानच्या मित्र देशावर तुटून पडण्याची सगळी प्लानिंग आहे.

Pralay Missile : भारताकडून हवेत दिशा बदलणारं घातक मिसाइल विकत घेऊन हा देश करतोय युद्धातील पराभवाचा बदला घेण्याची तयारी
Pralay Missile
| Updated on: Feb 22, 2026 | 3:14 PM
Share

जगातील वेगवेगळ्या देशात आता भारतीय शस्त्रास्त्रांचा धाक निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. आधीपासून भारताच्या पिनाका आणि एटीएजी तोपां सारख्या शस्त्रांचा वापर करणारा आर्मेनिया अझरबैजानला नियंत्रणात ठेवण्यासाठी भारताकडून प्रलय मिसाईल विकत घेण्याचा विचार करत आहे. 2020 साली आर्मेनिया अझरबैजानमध्ये नागोर्नो-काराबाख भागात युद्ध झालं होतं. त्यातून जे धडे मिळाले, त्यासाठी आर्मेनिया प्रलय मिसाइल खरेदी करण्याचा विचार करत आहे. 2020 साली आर्मेनिया आणि अझरबैजान या देशांमध्ये युद्ध झालं होतं. त्यावेळी अझरबैजानला तुर्कीची मदत मिळाली. तुर्कीचे ड्रोन्स आणि तोपा वापरुन अझबैजानने अर्मेनियाला हरवलं. या युद्धात आर्मेनियाने रशियन बनावटीच्या इस्कंदर बॅलेस्टिक मिसाइल्सनी हल्ला केला. पण इस्रायली एअर डिफेन्स सिस्टिमने हा मिसाइल हल्ला यशस्वीरित्या परतवून लावला.

नागोर्नो-काराबाखचा भाग अझरबैजानकडून गमावल्यानंतर आर्मेनियाला आपल्या कमकुवत बाजू लक्षात आल्या. त्यावेळी आर्मेनिया सोवियत युगातील जुन्या शस्त्रास्त्रांवर अवलंबून होता. इस्कंदर बॅलेस्टिक मिसाइल्स पारंपारिक पद्धतीने उड्डाणं करतं. या मिसाइल्सना अजरबैजानच्या एडवांस्ड एअर डिफेन्स शिल्डने रोखलं. आर्मेनियाचे सैन्य रणनितीकार हवेत दिशा बदलू शकणाऱ्या मिसाइलचा शोध घेत होते. अशा मिसाइल्सना ट्रॅक करणं शत्रुच्या रडारसाठी खूप कठीण असतं. आर्मेनियाला भारतीय बनावटीची प्रलय टॅक्टिकल बॅलेस्टिक मिसाइल त्यांच्या गरजेच्या हिशोबाने जास्त चांगली वाटली. प्रलय मिसाइलची रेंज इंटरनॅशनल एक्सपोर्ट नियमांमध्ये बसते. ते सुद्धा आर्मेनियाने हे मिसाइल निवडण्यामागचं एक कारण आहे.

प्रलयला ट्रॅक करणं खूप कठीण का?

भारतीय डिफेन्स रिसर्च अँड डेवलपमेंट ऑर्गनायज़ेशनने (DRDO) डिजाइन केलेली प्रलय एक खूप एडवांस्ड सरफेस-टू-सरफेस टॅक्टिकल बॅलेस्टिक मिसाइल आहे. याची रेंज 150 ते 500 किमी आहे. लक्ष्यावर प्रहार करताना हे मिसाइल हवेतच आपली दिशा सुद्धा बदलू शकते. या वैशिष्ट्यामुळेट प्रलयला ट्रॅक करणं खूप कठीण आहे. भारताच्या ताफ्यात आता एकापेक्षा एक सरस मिसाइल्स आहेत. यात ब्राह्मोस सर्वात घातक मिसाइल आहे. भारताने आतापर्यंत हे मिसाइल अनेक देशांना विकलं आहे. भविष्यातही ब्राह्मोसची रेंज अधिक घातक होणार आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा