AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गरज पडली तर इराणवर पुन्हा हल्ले…, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी

इराण-इस्त्रायल यांच्यात शस्त्रबंदी झाली आहे. परंतु इराणचे युरेनियम सुरक्षित असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे इराणने अणूबॉम्ब बनवण्याचा प्रयत्न केल्यास हवाई हल्ल्यांद्वारे इराणची अणू प्रकल्प पूर्णपणे नष्ट करण्यात येतील, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

गरज पडली तर इराणवर पुन्हा हल्ले..., अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
donald trumph
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 28, 2025 | 7:38 AM
Share

इराण आणि इस्त्रायलमधील युद्ध थांबले आहे. दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली आहे. यामुळे मध्यपूर्वेतील तणाव कमी झाला आहे. परंतु इराणमधील युरेनियम सुरक्षित असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला धमकी दिली आहे. इराणने अणूबॉम्ब बनवण्याचा प्रयत्न केल्यास हवाई हल्ल्यांद्वारे इराणची अणू प्रकल्प पूर्णपणे नष्ट करण्यात येतील, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, गरज पडल्यास आम्ही इराणवर हल्ला करण्यास मागेपुढे पाहणार नाही. जर भविष्यात इराणने संवेदनशील कारवाया पुन्हा सुरू केल्या तर अमेरिका पुन्हा हल्ला करू शकते.

इराणचा दावा फेटाळला

व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, इराणचा अणू प्रकल्प अमेरिकेसाठी चिंतेचा विषय असणार आहे. इराण सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या टिप्पणीला लवकरच उत्तर देण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी म्हटले. खामेनी यांनी युद्धबंदीनंतर म्हटले होते की, इराणने कतारमधील अमेरिकन लष्करी तळ उद्ध्वस्त केला. ही अमेरिकेसाठी मोठी चपराक आहे. इराणच्या अणू प्रकल्पाचे नुकसान नुकसान झाले नाही, हा इराणचा दावाही ट्रम्प यांनी फेटाळून लावला. इराणच्या अणुस्थळांची तपासणी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग किंवा इतर कोणत्याही प्रतिष्ठित स्रोताकडून करण्याचे त्यांनी समर्थन केले.

इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांनी दावा केला होता की, अणू प्रकल्पांना कोणतेही नुकसान झाले नाही. परंतु अमेरिकेच्या संरक्षणमंत्र्यांचा दावा आहे की त्यांचे सर्व अणू तळ उद्ध्वस्त केले गेले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांनी इराणच्या अणू प्रकल्पांचे नुकसान झालेले नाही, असा दावा तो दावा अमेरिका आणि इस्त्रायलसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

गाझामधील युद्धही थांबणार

गाझामध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध १५ दिवसांत संपेल, असा दावा केला जात आहे. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांनी गाझामधील युद्ध थांबवण्यावर भर दिला आहे. तसेच अब्राहम करारांचा विस्तार करण्याचे वक्तव्य केले आहे. युएई आणि इजिप्तच्या सहकार्याने इस्रायलच्या नेतृत्वाखाली गाझामध्ये सरकार चालवण्याची चर्चाही झाली आहे.

Follow Us
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर...
Manoj Jarange | मुख्यमंत्री फडणवीसांच्या सहीची लेखी हमी द्या! उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटलांची मोठी मागणी
20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी..
Manoj Jarange Patil |  20 दिवसांचं उपोषण सोडलं, पण प्रकृती खालावली! जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल होणार
90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं!
Maratha Reservation | 90 दिवसांचा अल्टिमेटम देत जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं! 58 लाख नोंदी अन् हैदराबाद गॅझेटवरही मोठी अपडेट
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...