इराणवरील हल्ला; नेतान्याहू यांची ट्रम्प यांच्या खांद्यावरुन बंदूक ?

इस्राईलवरील हल्ला हा नेमका प्लान कोणाचा होता. इस्राईलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या तालावर ट्रम्प यांनी हा मोठा धोका पत्करला काय असा सवाल आता खुद्द अमेरिकेत होत आहे.

इराणवरील हल्ला; नेतान्याहू यांची ट्रम्प यांच्या खांद्यावरुन बंदूक ?
netanyahu and trump
| Updated on: Mar 03, 2026 | 10:12 PM

बेंजामिन नेतान्याहू यांनी अखेर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मॅनेज करुन इराणवरील आपले हल्ल्याचे स्वप्न पूर्ण करुन घेतले आहे.ट्रम्प हे स्वत:ला जगाच्या सर्व समस्यांवरील सोल्युशन देणारे महानायक म्हणून सादर करु इच्छीत होते. त्यांच्या या मानसिक कमजोरीचा चाणाक्ष नेतान्याहू यांनी फायदा उचलला आणि ट्रम्प यांना युद्धाच्या दरीत ढकलले आहे. याचा शेवट काय होणार हे कोणालाच माहिती नाही अशा विचित्र कोंडीत जग सापडले आहे. गेले सहा राष्ट्राध्यक्ष जे करु धजले नाहीत ते ट्रम्प यांच्याखांद्यावरुन बंदूकीचा बार करुन नेतान्याहू यांनी करवून दाखवले आहे.

इराणची समस्या केवळ निर्बंध किंवा चर्चेच्या फेऱ्यांनी किंवा छोट्या मोठ्या हल्ल्यांनी सुटणार नाही हे ट्रम्प यांच्या गळी उतरवण्यात नेतान्याहू यशस्वी झाले आहेत. त्यांनी इराणवर थेट हल्ला करुन इतिहासाच्या पानांवर सुवर्णअक्षरात तुमचे नाव नोंदले जाल असे चित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोर नेतान्याहू यांनी साकारले.

अमेरिकेतही ही चर्चा सुरु

आयातुल्ला खामेनी सह इराणची टॉप लीडरशिप संपवून आपण युद्ध जिंकू शकू या भ्रमात ट्रम्प संतुष्ट झाले. मात्र, इराणने टॉप लीडरशिप नष्ट होऊनही केवळ अमेरिका-इस्राईल नव्हे तर गल्फच्या शेजारील देशांची देखील झोप उडविली आहे. यामुळे या युद्धाचे शेवटचे टोक दिसत नाही अशी परिस्थिती आहे. हॉर्मुज स्ट्रेटमधून होणारी जगातील २० ते ३० टक्के इंधन पुरवठा थांबला आहे. ग्लोबल इकॉनॉमीवर संकटाचे ढग जमा झालेले आहेत. आणि स्वत:च्या बोटांवर जगाला नाचवायला निघालेले ट्रम्प यांना आता स्वत: नेतान्याहूंच्या तालावर नाचायला भाग पडले आहेत. इराणच्या हल्ल्यासाठी इस्राईलचा दबाव होता की नाही यावर आता अमेरिकेतही चर्चा सुरु आहे. याचा अंदाज अमेरिका आणि इस्राईलच्या अलिकडच्या वक्तव्यांवरुन येत आहे.

अमेरिका आणि इस्राईल नेत्यांची वक्तव्ये

“इस्राईलन इराणवर हल्ल्या करण्याचे नियोजित केले होते. आणि असे झाले तर इराण त्या बदल्यात अमेरिकन सैनिकांना टार्गेट करणार हे निश्चित होते. त्यामुळे ट्रम्प एडमिनिस्ट्रेशनला या हल्ल्याचा एक भाग व्हावे लागले.

मार्को रुबियो – युएस सेक्रेटरी ऑफ स्टेट

“प्रेसिडंट ट्रम्प यांना माहिती होते की अमरिकेचे हित कशात आहे. ते त्याच हिशेबाने निर्णय घेतात. आम्ही वाईट शक्तींविरोधात लढत आहोत. कारण आम्ही चांगले लोक आहोत.आमच्याद्वारे ते मास टेररिस्टना टार्गेट करत आहेत.”

बेंजामिन नेतान्याहू – इस्राईलचे पंतप्रधान

गेल्या वर्षी जून २०२५ रोजी जेव्हा अमेरिकाने इराणवर एका रात्री छोटी एअर स्ट्राईक केली होती. तेव्हा त्याला एक सावधानतेचा इशारा मानले गेले. इराणच्या आण्विक बॉम्ब बनवायच्या इराद्याला अनेक वर्षे मागे ढकलेले गेले. इस्राईलने यास पुरेसे मानले नाही. त्यामुळे हे अर्धवट काम इराणला आणखी खतरनाक बनवेल. इस्राईलने खामेनी यांच्या प्रत्येक क्षणाची माहिती मिळवली आणि अमेरिकेला निर्णायक हल्ल्यासाठी राजी केले.

त्याचा परिपाक म्हणून आता फेब्रुवारी २०२६ मध्ये अमेरिकेच्या ऑपरेशन एपिक प्युरीद्वारे इराणच्या संपूर्ण सरकारी आणि सैन्य ढाच्याला टार्गेट केले गेले. सोबत इस्राईलचे ऑपरेशन रोअरिंग लायन देखील जारी आहे. यात काही शंका नाही की अमेरिका आणि इस्राईलने इराणचे शीर्ष नेतृत्व संपवले आहे. परंतू ट्रम्प यांची ही सर्वात मोठी चूक होती. या उपर आता इराणने टोटल वॉरची घोषणा केली आहे. आता हा एक दिवसाचा हल्ला नाही, तर एक असे अंतहिन युद्ध बनले आहे ज्याने व्हिएतनाम, इराक आणि अफगाणिस्तान युद्धाच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us