Ayatollah Khamenei: इराणचे सुप्रीम लीडर खोमेनींची डेड बॉडी आहे कुठे? ना कोणता फोटो, ना मृतदेह दफन केल्याचा पुरावा, सत्य काय?

Ayatollah Khamenei Big Update: खोमेनी यांच्या मृत्याला आता तीन दिवस उलटले आहेत. पण त्यांचा मृतदेह अद्याप समोर आलेला नाही, ना त्यांच्या अंतिम संस्काराची बातमी समोर आलेली नाही. डोृतनाल्ड ट्रम्प आणि नेतन्याहू यांनी त्यांचा मृतदेह पाहिलाय असा दावा करण्यात येत आहे. काय आहे सत्य?

Ayatollah Khamenei: इराणचे सुप्रीम लीडर खोमेनींची डेड बॉडी आहे कुठे? ना कोणता फोटो, ना मृतदेह दफन केल्याचा पुरावा, सत्य काय?
इराणचे सुप्रीम लीडर खोमेनींची डेड बॉडी आहे कुठे?
Image Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: Mar 03, 2026 | 4:33 PM

Where is Ayatollah Khamenei Dead Body: सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांच्या निधनानंतर इराणचे उत्तराधिकारी कोण याची चर्चा सुरू आहे. पण त्याचवेळी खोमेनी यांचा मृतदेह कुठे आहे, हा प्रश्न सर्वांनाच सतावत आहे. कारण खोमेनी ठार झाल्याचे वृत्त इराणी वृत्तवाहिन्यांवरून देण्यात आले. पण त्यांचा मृतदेह अथवा त्यांचे दफनविधी कुठेच दिसला नाही. शनिवारी 28 फेब्रुवारी रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेच्या एका भीषण हल्ल्यात खोमेनी हे कुटुंबासह ठार झाल्याचा दावा करण्यात येत आहे. खोमेनी हे सरकारी कार्यालयात असताना हा भीषण हल्ला करण्यात आला होता. त्यांचे सहकारी सुद्धा या हल्ल्यात ठार झाल्याचे मानल्या जात आहे. रेव्हेल्युशनरी गार्डचे प्रमुख
मोहम्मद पाकपूर आणि सुरक्षा सलाहकार अली शमखानी यांच्यासोबत बैठक सुरू असतानाच मोठा स्फोट झाला. त्यात खोमेनी जागीच ठार झाले.

ट्रम्प आणि नेतन्याहू यांनी पाहिले शव

न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, स्ट्राईकनंतर खोमेनींचा मृतदेह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पाहिला. खोमेनी यांचा मृतदेह छिन्न-विच्छन्न झाला होता. इमारतीच्या ढिगाऱ्यातून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर या मृतदेहाचा फोटो घेण्यात आला. तो फोटो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पाठवण्यात आला. हा फोटो कोणी आणि कसा काढला याची माहिती समोर येऊ शकले नाही.

कान मीडियानुसार, सुरुवातीला मोसादच्या गुप्तहेरांनी खोमेनींचा मृतदेह अगोदर ताब्यात घेतला. त्याविषयीचे कागदपत्रे तयार केली. त्यानंतर मृतदेह तिथेच सोडला. खोमेनींची ओळख पटवणारे सर्व कागदपत्रे इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना पाठवण्यात आली. या संपूर्ण घटनाक्रमाविषयी इराणने अद्याप कोणतेही अधिकृत वृत्त दिलेले नाही. वक्तव्य केलेले नाही.

दफनविधी झाला की नाही?

अधिकृतपणे इराणने खोमेनी यांच्या अंतिम संस्कारविषयी कोणतीच माहिती समोर आणलेली नाही. खोमेनींचा दफनविधी झाला की नाही याविषयी पण सस्पेन्स कायम आहे. पण दोन चर्चा सुरू आहेत. पहिली चर्चा अशी आहे की त्यांचा अंतिम संस्कार तेहरानमध्ये होऊ शकतो. इराणचे पहिले सुप्रीम लीडर अयातुल्ला खोमेनी यांचा अंतिम संस्कार हा तेहरानमध्येच झाला आहे. तेहरानमधील बेहश्त-ए ज़हरा कब्रिस्तानमध्ये त्यांना दफन करण्यात आले आहे.

दुसरी चर्चा खोमेनी यांचे मूळ गाव मशहद येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. मशहद येथे शियांचे 8 वें इमाम अली इब्न मूसा अल-रजा यांना दफन करण्यात आले होते. हे इराणचे पवित्र स्थळ मानण्यात येते. 2024 मध्ये खोमेनींचे जवळचे इब्राहिम रईसी यांना इथेचे चिरविश्रांती मिळाली होती. तर अजून एक तर्क असा बांधण्यात येतो की, युद्ध संपल्यावर इराणमध्ये खोमेनी यांचा दफनविधी करण्यात येईल. हिजबुल्लाह चीफ हसन नसरुल्लाह याचा दफनविधी सुद्दा मृत्यूच्या 5 महिन्यानंतर झाला होता. त्या अंत्यविधीवेळी खोमेनी उपस्थित होते.

Follow Us