
पाकिस्तान गळ्यापर्यंत कर्जात बुडाला आहे. स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी पाकिस्तानला सतत IMF कडे हात पसरावे लागत आहेत. आता भारताचा आणखी एक शेजारी बांग्लादेश बरबादीच्या वाटेवर आहे. बांग्लादेश सुद्धा कर्जाच्या जाळ्यात अडकत चालला आहे. अलीकडे एक रिपोर्ट आलाय. त्यावरुन दिसतय की, बांग्लादेश पाच वर्षात पुरता कर्जामध्ये बुडाला आहे. कर्जाच्या या विळख्यातून बाहेर येणं बांग्लादेशसाठी अजिबात सोपं नाहीय. बांग्लादेश कर्जाच्या जाळ्यात फसला आहे हे बांग्लादेश नॅशनल बोर्ड ऑफ रेवेन्यूचे (NBR) के चेअरमन मोहम्मद अब्दुर रहमान खान यांनी मान्य केलं. मागच्या एक दशकात अनेक रिसर्चर्स आणि अर्थतज्ज्ञांनी बांग्लादेश कर्जाच्या जाळ्यात फसल्याबद्दल चिंता व्यक्त केली. जागतिक बँकेने या आठवड्यात इंटरनॅशनल डेब्ट रिपोर्ट जारी केलाय. या रिपोर्टनुसार, मागच्या 5 वर्षात बांग्लादेशवर बाहेरील कर्ज मोठ्या प्रमाणात वाढलं आहे.
देशावर परदेशी कर्ज एकूण 42 टक्के वाढलं आहे. 2024 च्या अखेरपर्यंत बांग्लादेशवरील एकूण बाहेरील कर्ज 104.48 अब्ज डॉलर होतं. तेच 2020 मध्ये हेच कर्ज 73.55 अब्ज डॉलर होतं. दुसऱ्याबाजूला 2024 मध्ये पाकिस्तावर बाहेरील कर्ज 130 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचलं आहे. जागतिक बँकेच्या आकड्यांवरुन ही माहिती समोर आली आहे. जागतिक बँकेने बांग्लादेशचा समावेश त्या देशांमध्ये केला आहे, ज्यांच्यावर बाहेरील कर्ज फेडण्याचा दबाव वेगाने वाढतोय.
बांग्लादेशने IMF कडून किती कर्ज घेतलय?
बांग्लादेश आणि पाकिस्तान दोघांनी IMF कडून कर्ज घेतलं आहे. IMF च्या 15 ऑक्टोंबर 2025 च्या रिपोर्टनुसार पाकिस्तानने 8.96 अब्ल डॉलर्सच कर्ज घेतलं आहे. तेच बांग्लादेशने 3. 97 अब्ज डॉलर्सच कर्ज घेतलं आहे.
पाकिस्तानवर किती कर्ज?
वर्ल्ड बँकेच्या International Debt Report 2025 नुसार, 2024 मध्ये पाकिस्तानवरील एकूण बाहेरील कर्ज जवळपास 130 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचलं आहे. कर्ज फेडण्यासाठी पाकिस्तानचं 40 टक्के निर्यात उत्पन्न खर्च होत आहे.
पाकिस्तानने कुठल्या देशाकडून किती कर्ज घेतलय?
रिपोर्टनुसार पाकिस्तानने 49% कर्ज बहुपक्षीय संस्था World Bank, ADB कडून घेतलं आहे. 18% वर्ल्ड बँक, 16% ADB, 15% अन्य संस्था आणि 43% कर्ज द्विपक्षीय देशांकडून घेतलं आहे. यात 23% चीन, 5% सौदी अरेबिया आणि 8% खासगी कर्जदाता आहेत. 1947 पासून आतापर्यंत अमेरिकेने पाकिस्तानला सैन्य आणि आर्थिक मदत म्हणून जवळपास 100 अब्ज डॉलर दिले आहेत.