Pakistan IMF Loan : कटोरा घेऊन गेलेल्या पाकिस्तानला IMF पुन्हा कर्ज देणार, पण यावेळी भीक देताना अशी अट टाकली की….
Pakistan IMF Loan : गळ्यापर्यंत कर्जात बुडालेला पाकिस्तान पुन्हा एकदा कटोरा घेऊन IMF कडे कर्जासाठी गेला आहे. यावेळी आयएमएफने कर्ज देताना अशी अट टाकलीय की, त्यांची कोंडी झाली आहे. त्यांना नाईलाजाने एक महत्वाची राष्ट्रीय संपत्ती विकावी लागणार आहे.

कंगाल पाकिस्तानसाठी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्था IMF ने आपला खजिना उघडला आहे. पाकिस्तान गळ्यापर्यंत कर्जात बुडाला आहे आणि देशातील वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी IMF बोर्डाने सोमवारी नव्या कर्ज समीक्षेला मंजुरी दिली. यातून पाकिस्तानला जवळपास 1.2 अब्ज डॉलर मिळणार आहेत. या निर्णयामुळे पाकिस्तानला परदेशी चलन साठा वाढवायला आणि महागाई नियंत्रणात ठेवायला मदत होणार आहे. IMF कर्ज देणार असल्यामुळे पाकिस्तानला जीव भांड्यात पडला आहे. त्यांना परदेशी चलन साठा मजूबत करता येईल. आता बोर्डाच्या मंजुरी नंतर पुढच्या काही दिवसात पाकिस्तानला हा फंड मिळेल. यामुळे पाकिस्तानच्या कमजोर अर्थव्यवस्थेला थोडा दिलासा मिळेल. पाकिस्तानसाठी हा पैसा खूप महत्वाचा आहे.
IMF ने पाकिस्तानला लोन देण्यासह काही अटी त्यांच्यासमोर ठेवल्या आहेत. पाकिस्तानने जास्त कमाई करावी अशी IMF ची इच्छा आहे. पण त्याचवेळी सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाचा वेग वाढवावा असही म्हटलं आहे. टॅक्स वसुलीमध्ये सुधारणा, नुकसान कमी करणं आणि आर्थिक सुधारणेचा वेग वाढवण्यावर भर द्यावा अशी आयएमएफची इच्छा आहे. जगाची स्थिती लक्षात घेऊन पाकिस्तानने आर्थिक समजदाराची धोरणं स्वीकारावी, जेणेकरुन त्यांची अर्थव्यवस्था मजबूत होईल असं आयएमएफला वाटतं. अशा सुधारणा लागू कराव्यात ज्यात खासगी क्षेत्राच्या मदतीने देशात विकास होईल.
IMF ने पाकिस्तानबद्दल काय म्हटलं?
IMF बोर्डाने पाकिस्तानला 7 अरब डॉलरच्या एक्सटेंडेड फंड फॅसिलिटीद्वारे 1 अब्ज डॉलर आणि रेजिलिएंस अँड सस्टेनेबिलिटी फॅसिलिटी अंतर्गत 20 कोटी डॉलर जारी करायला मंजुरी दिली आहे. या दोन्ही कार्यक्रमातंर्गत आतापर्यंत पाकिस्तानला एकूण 3.3 अब्ज डॉलर मिळाले आहेत. ऑक्टोंबर महिन्यात स्टाफ लेवल करारानंतर ही मंजुरी देण्यात आली. त्यावेळी आयएमएफने म्हटलेलं की, “पाकिस्तान आपली अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी प्रगती करत आहे. महागाई कमी होतेय, परदेशी चलन साठा वाढतोय आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे”
PIA चा लिलाव करण्याची वेळ
पाकिस्तान IMF कार्यक्रमातंर्गत आपली मोठी प्रायवेटायजेशन प्रक्रिया पुढे नेत आहे. 20 वर्षातील हे सर्वात मोठं खासगीकरण आहे असं IMF बोर्डाने म्हटलं. कर्जातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तान आता आपला एअरपोर्ट विकत आहे. पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी मागच्या आठवड्यात सांगितलं की, पाकिस्तान इंटरनॅशन एअरलाइन्समधील हिस्सेदारी विकण्यासाठी 23 डिसेंबरला बोली लागेल. चार निवडलेल्या समूहांना या बोलीमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे.
IMF च्या दबावाखाली पाकिस्तानला PIA चा लिलाव करावा लागत आहे. हा एअरपोर्ट खरेदी करण्यासाठी फौजी फर्टिलायजर कंपनी, लकी सिमेंट समूह, आरिफ हबीब कॉर्प आणि एअर ब्लू लिमिटेड सारख्या कंपन्या तयार आहेत.
