India-Bangladesh : बांग्लादेशची इतकी मजल, भारतीय चिडतील असं काम केलं, बॉर्डरवर वाढलं टेन्शन

India-Bangladesh : सध्या भारत-बांग्लादेश संबंध ताणले गेलेले आहेत. शेख हसीना सत्तेतून पायउतार झाल्यापासून बांग्लादेशात सत्तेवर येणारे नवीन शासक सतत भारत विरोधी भूमिका घेत आहेत. आता सीमेवर बांग्लादेशी नागरिकांनी भारतीयांना चीड येईल अशी कृती केली आहे.

India-Bangladesh : बांग्लादेशची इतकी मजल, भारतीय चिडतील असं काम केलं, बॉर्डरवर वाढलं टेन्शन
India-Bangladesh
Image Credit source: PTI
| Updated on: Aug 12, 2026 | 1:05 PM

भारत-बांग्लादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर तणाव वाढला आहे. तणाव वाढवण्याच्या घटनेसाठी बांग्लादेशी नागरिकांची एक कृती जबाबदार आहे. मंगळवारी काही बांग्लादेशी भारतात घुसले व त्यांनी दोन शेतकऱ्यांचं अपहरण केलं. पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्याजवळ ही घटना घडली. सीमावर्ती भागात दोन भारतीय शेतकरी शेतात काम करत होते. त्यावेळी काही बांग्लादेशी सीमा ओलांडून भारतीय हद्दीत घुसले. शेतात काम करणाऱ्या दोन भारतीय शेतकऱ्यांचं त्यांनी अपहरण केलं. ओढत, खेचत त्यांना आपल्या हद्दीत घेऊन गेले. एका बांग्लादेशी नागरिक सीमा सुरक्षा दल BSF च्या ताब्यात आहे. त्या 70 वर्षीय बांग्लादेशी नागरिकाची BSF ने सुटका करावी यासाठी बांग्लादेशी नागरिकांनी हे पाऊल उचललं.

BSF वर दबाव आणण्यासाठी त्यांनी हे सर्व केलं. भारतीय नागरिकांचं अपहरण केल्यास सीमा सुरक्षा दलावरील दबाव वाढेल व ते आपल्या नागरिकाची सुटका करतील हे सर्व प्लानिंग त्यामागे होतं. बांग्लादेशातील स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, BSF आणि बॉर्डर गार्ड बांग्लादेश यांच्यात फ्लॅट मीटिंग झाली. त्यात ठरल्यानुसार, तिन्ही नागरिकांची अदलाबदली करुन सुटका करण्यात आली.

पण बीएसएफने ऐकलं नाही

रिपोर्ट्सनुसार या सर्व वादाची सुरुवात मंगळवारी सकाळी झाली. मेहेरपूर इच्छाखाली बॉर्डरजवळ अब्दुल मन्नान हा बांग्लादेशचा शेतकरी आपल्या पिकांवर किटकनाशकांच्या फवारणीसाठी गेला होता. BSF च्या जवानांनी बॉर्डर नियमांच उल्लंघन केल्याचा आरोप करत अब्दुल मन्नानला ताब्यात घेतलं असं बांग्लादेशी मीडियाचं म्हणणं आहे. अब्दुल मन्नानच्या अटकेची बातमी कळताच त्यांचे नातेवाईक आणि स्थानिक बांग्लादेशी नागरिक चिडले. त्यांनी मन्नानला सोडण्याची विनंती केली पण बीएसएफने ऐकलं नाही, अस मन्नाच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे.

तात्काळ फ्लॅग मीटिंग

त्यानंतर चिडलेले हे सर्व बांग्लादेशी भारतीय हद्दीत घुसले. शेतात काम करणाऱ्या दोन शेतकऱ्यांना उचललं व आपल्यासोबत घेऊन गेले. या भारतीय शेतकऱ्यांना बीजीबीकडे सोपवलं. सचिन कर्मकार आणि नारायण देब अशी या दोन भारतीय शेतकऱ्यांची नावं आहेत. आंतरराष्ट्रीय सीमेवर तणाव वाढल्यानंतर इच्छाखाली सीमेवर लगेच BSF आणि BGB अधिकाऱ्यांची तात्काळ फ्लॅग मीटिंग बोलवण्यात येईल. त्यानंतर अब्दुल मन्नानला बीजीबीकडे सोपवलं तर भारतीय शेतकऱ्यांना बीएसएफकडे सोपवण्यात आलं.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us