AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर पाकिस्तानला BSF जवानाला सोडावं लागलं, मग भारताने सुद्धा केलं तसच

बॉर्डरवर तैनात असताना BSF चा एक जवान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेला होता. त्याला लगेच पाकिस्तानी रेंजर्सनी पकडलं होतं. आता या जवानाला पुन्हा भारताकडे सोपवण्यात आलय. पाकिस्तानच्या या कृतीनंतर भारताने सुद्धा तसच केलय.

अखेर पाकिस्तानला BSF जवानाला सोडावं लागलं, मग भारताने सुद्धा केलं तसच
PK Sahu
| Updated on: May 14, 2025 | 12:22 PM
Share

BSF जवान पूर्णब कुमार शॉ पाकिस्तानातून परतले आहेत. भारताने सुद्धा पूर्णब कुमार शॉ यांच्या बदल्यात पाकिस्तानी रेंजर्सना परत पाठवलय. जवान पीके साहू यांना पाकिस्तानने भारताकडे सोपवलय. ते अटारी बॉर्डरवरुन परत आले आहेत. बीएसएफ जवान चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेला होता. त्यानंतर भारताने सुद्धा पाकिस्तानी रेंजर्सच्या एका सैनिकाला पकडलं होतं. आता दोन्ही देशांनी जवान आणि रेंजर्सच एक्सेंज केलं आहे. जवान आणि रेंजर्सची एक्सेंज करण्याची प्रक्रिया सकाळी 10.30 वाजता अटारीमध्ये झाली.

बीएसएफकडून जवान भारतात परतल्याची माहिती देण्यात आली आहे. आज बीएसएफ जवान पीके शॉ परत आले. 23 एप्रिल 2025 पासून ते पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात होते. पीके शॉ यांना 10.30 वाजण्याच्या सुमारास संयुक्त चेक पोस्ट अटारीवरुन भारताकडे सोपवण्यात आलं. हँडओव्हर शांततापूर्ण आणि प्रोटोकॉलनुसार झाल्याच बीएसएफकडून प्रेस रिलीजमध्ये सांगण्यात आलय.

पाकिस्तानी रेंजरला कुठे पकडलेलं?

सध्या भारत-पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव आहे. दोन्ही देशांकडून मिसाइल आणि ड्रोनद्वारे परस्परांवर हल्ले करण्यात आले. भारताने पाकिस्तानला दहशतवादाविरोधात सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. आता दोन्ही देशांमध्ये सीजफायर झालं आहे. सीजफायरनंतर 14 मे रोजी बीएसएफ आणि पाकिस्तानी रेंजर्सनी आपपाल्या भागात पकडलेल्या जवानांना शांततामय मार्गाने परस्परांना परत केलय. फिरोजपूर येथे पाकिस्तान सीमेजवळ पाक रेंजर्सनी भारताच्या जवानाला अटक केली होती. दुसरीकडे बीएसएफने राजस्थानात भारतीय सीमेजवळ पाकिस्तानी रेंजरला पकडलं होतं. जवानाच्या बदल्यात भारताने सुद्धा पाक रेंजरला पाकिस्तानला सोपवलं आहे.

सीमेत घुसण्याचा प्रयत्न

राजस्थानच्या श्रीगंगानगर येथे भारत-पाकिस्तान इंटरनॅशनल बॉर्डरवर बीएसएफने एका पाकिस्तानी रेंजरला अटक केली होती. पाक रेंजर बॉर्डर क्रॉस करुन भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी सीमेवर सर्तक असलेल्या जवानांच्या नजरेत ही गोष्ट आली. त्यानंतर रेंजरला पकडण्यात आलं. आता भारताने पाकिस्तानी रेंजरला एक्सेंजच्या बदल्यात परत केलय.

बीएसएफ जवान पाकिस्तानच्या हद्दीत कसा गेला?

बीएसएफ जवान पूर्णब कुमार साहू 23 एप्रिलपासून पाकिस्तानच्या ताब्यात होते. साहू यांनी अलीकडेच पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यात भारत-पंजाब सीमेवर ड्युटीवर रुजू झालेले. 23 एप्रिल रोजी झिरो लाइनजवळ शेतात काम करणाऱ्या एका शेतकऱ्याची मदत करताना चुकून ते पाकिस्तानच्या सीमेमध्ये गेले. त्याचवेळी पाकिस्तानी बॉर्डरवर तैनात असलेल्या रेंजर्सनी त्यांना पकडलं होतं. पीके साहू पश्चिम बंगालच्या हुगळीचे निवासी आहेत.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.