आता तोच प्रश्न बराक ओबामांना-त्यादिवशी तुम्ही पत्नी मिशेलसोबत सेक्स केला होता काय? वाचा उत्तर!

अमेरिकेची माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांना (Barak Obama) मुलाखतकारानं सेक्सबद्दल प्रश्न विचारला होता आणि त्याचं उत्तर त्यांनी काय दिलं याची आता चर्चा होतीय. (barak obama michelle obama sex)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:36 PM, 20 Mar 2021
आता तोच प्रश्न बराक ओबामांना-त्यादिवशी तुम्ही पत्नी मिशेलसोबत सेक्स केला होता काय? वाचा उत्तर!
बराक ओबामा आणि मिशेल ओबामा

वॉशिंग्टन : हाच प्रश्न दोन एक दिवसांपुर्वी मिशेल ओबामांना (Michelle Obama) विचारला गेला. तोही एका टॉक शोमध्ये. त्यावर त्यांनी प्रश्न विचारणाऱ्याला अप्रत्यक्षपणे फटकारलं पण तोच प्रश्न अमेरिकेची माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांना (Barak Obama) त्याच मुलाखतकारानं विचारला होता आणि त्याचं उत्तर त्यांनी काय दिलं याची आता चर्चा होतीय. (Barak Obama answers sex question with Michelle Obama)

‘त्या’ दिवशी तुम्ही सेक्स केला होता का?

गेल्यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात Jimmy Kimmel Live शोमध्ये बराक ओबामा हे आत्मचरित्राचं प्रमोशन करण्यासाठी आले होते. विषय अर्थातच आत्मचरित्र A Promised Land चा होता पण मुलाखत घेणाऱ्यानं ओबामांना थेट पर्सनल प्रश्न विचारला- ज्यादिवशी अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला नेव्ही सीलनं कंठस्नान घातलं त्यादिवशी तुम्ही पत्नी मिशेल ओबामांसोबत सेक्स केला का? जिम्मीचा हा प्रश्न ओबामांना अपेक्षीत नसावा. ओबामा छोटासा पॉज घेत म्हणाले, पर्सनल प्रश्न आहे. तितक्यात मुलाखत घेणाऱ्या जिम्मीनं त्यांना आठवण करुन दिली की, काही दिवसांपुर्वीच त्यानं मिशेल ओबामांची मुलाखत घेतली होती, त्यातही त्यांना हा प्रश्न विचारला होता. त्यांनी पुढच्या मुलाखतीत याचं उत्तर देण्याचं मान्य केलं आहे. जिम्मीनं जोडलेलं स्पष्टीकरण पहाताच ओबामांनीही फार का कू न करता थेट उत्तर देणच पसंत केलं. त्याचं उत्तर बरचसं वास्तववादी आहे.

नेमकं काय म्हणाले बराक ओबामा?

सेक्सच्या प्रश्नावर उत्तर देताना बराक ओबामा म्हणाले की, खरंच मिशेलनं तुम्हाला उत्तर द्यायचं कबूल केलं आहे? मग जिम्मीनं (Jimmy Kimmel)पुस्तकातला एक संदर्भ देत खात्री दिली की खरोखरच मिशेल ओबामांनी उत्तर देण्याचं कबूल केलं. मग ओबामांनीही थेट उत्तर न देता सरळ सांगितलं की, असं काही त्यादिवशी झालेलं नाही. मिशेल ह्या खूप लवकर झोपी जातात. म्हणजे रात्री 9 वाजता त्या बेडवर पडतात. मी जोपर्यंत काम संपून गेलेलो असतो त्यावेळी ती गाढ झोपेत असते. तो दिवसही त्याला अपवाद नाही. ओबामांच्या उत्तरावर मुलाखतकार म्हणाले की तुम्ही उगीच काही तरी कारण देत आहात तर क्षणाचाही विलंब न लावता, ओबामा म्हणाले की हेच खरं आहे.

तीन दिवसांपुर्वी मिशेल याच प्रश्नावर काय म्हणाल्या?

लादेनचा खात्मा आणि त्यानंतर मिशेल यांना सेक्सवर केलेला प्रश्न. त्यानंतर पुढच्या मुलाखतीत याचं उत्तर देते असं म्हणनं आणि त्याची संधी Jimmy Kimmel यांना पुन्हा मिळणं हा एक योगायोगच म्हणावा लागेल. पण ज्या सोज्वळपणानं पुढच्या वेळेस उत्तर देते असं मिशेल म्हणाल्या होत्या तसं काही त्यांनी केल्याचं दिसत नाही. मिशेल ओबामा ह्या तीन दिवसांपुर्वी Jimmy Kimmel Live मध्ये स्वत:चा शो प्रमोट करण्यासाठी आल्या होत्या. जिम्मीनं त्यांना दिलेल्या आश्वासनाची आठवण करुन देत थेट प्रश्न केला. लादेनला मारलं त्यादिवशी तुम्ही बराक ओबामांसोबत सेक्स केला होता का? त्यावर मिशेल म्हणाल्या, मी तुमच्या दर्शकांना सांगू इच्छिते की, का कुणास ठाऊक, एवढ्या मोठ्या आणि महत्वपूर्ण मिशनमध्ये तुम्हाला एवढाच भाग का महत्वाचा वाटतो? इतर कुणाला कधी असं विचारावसं नाही वाटलं. मुलाखतीच्या इतिहासात क्वचितच कुणी एवढ्या खालच्या पातळीवर गेलं असेल.

इतर बातम्या :

ज्या दिवशी लादेनला ओबामाच्या आदेशावर मारलं त्यादिवशी तुम्ही त्यांच्यासोबत सेक्स केला? काय म्हणाल्या पत्नी मिशेल ओबामा?…

(Barak Obama answers sex question with Michelle Obama)