मोठी बातमी! ज्याची भीती होती तेच घडलं, इराणचा अमेरिकेला सर्वात मोठा झटका, आता ट्रम्प काय करणार? जगाचं लक्ष
इराण आणि अमेरिकेमध्ये युद्ध सुरूच आहे. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर जोरदार हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर आता मोठी बातमी समोर आली आहे. इराणने अमेरिकेला मोठा धक्का दिला आहे.

इराण आणि अमेरिकेमध्ये युद्ध सुरूच आहे. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर जोरदार हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर मध्य पूर्वेत युद्ध चांगलंच पेटलं. अमेरिकेकडून आतापर्यंत इराणवर अनेक भीषण हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. इराणच्या पायाभूत सुविधा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. तर दुसरीकडे इराणकडून देखील अमेरिकेच्या सैन्य दलावर तसेच ज्या ज्या आखाती देशांमध्ये अमेरिकेची सैन्य तळं आहेत, अशा देशांवर देखील मिसाईल हल्ले करण्यात आले आहेत.
आता मध्य पूर्वेतून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे इराणने अमेरिकेला मोठा धक्का दिला आहे. इराण रिव्हेन्यूशनरी गार्ड्सकडून मोठा दावा करण्यात आला आहे. होर्मूज स्ट्रेटच्या प्रवेशद्वारावर इराने अमेरिकेची क्रू मेंबंर्स नसलेली एक पाणबुडी ताब्यात घेतली आहे. ही एक मोठी ऑटोनॉमस अंडरवॉटर व्हेकल असल्याची माहिती देखील इराणकडून देण्यात आली आहे. दरम्यान इराणने अमेरिकेची ही पाणबुडी ताब्यात घेतल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
रिवोल्यूशनरी गार्ड्स ने पुढे बोलताना असं देखील म्हटलं आहे की, आम्ही ‘दहशतवादी’ अमेरिकन सैन्याची सर्वात जास्त अद्ययावत इंटेलिजेंट आणि पायलट नसलेली एक पाणबुडी ताब्यात घेतली आहे. मात्र दुसरीकडे अमेरिकेकडून यासदंर्भात असा दावा करण्यात आला आहे, की आमचं एक अंडरवॉटर ड्रोन एक दिवसापूर्वी खराब झालं होतं, आमचं स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये जिथे ऑपरेशन सुरू आहे, तेथील पाण्याचा सर्व्हे करण्यासठी हे ड्रोन वापरण्यात येत होतं, असा दावा अमेरिकेकडून करण्यात आला आहे.
युद्ध सुरूच
28 फेब्रुवारी रोजी युद्धाची पहिली ठिणगी पडली होती. त्यानंतर अजूनही युद्ध सुरूच आहे. मधे काही दिवस अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला होता. परंतु त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम संपल्याची घोषणा केली आणि पुन्हा एकदा इराण अमेरिकेमध्ये भीषण युद्धाला सुरुवात झाली आहे. अमेरिकेकडून हल्ले सुरूच आहेत.