‘मोदी का बाप भी जाएगा’, भर सभेत खरगे यांचं विधान, रागात येऊन श्रोत्याला उत्तर; व्हिडीओ प्रचंड व्हायरल!
खरगे यांचे भाषण थांबवून मोदी नही जाएगा असे विधान केल्यामुळे उसस्थितांना राग अनावर झाला. संबंधित व्यक्तीला इतर प्रेक्षकांनी चांगलाच चोप दिला.

Mallikarjun Kharge On Narendra Modi : निडवणूक आयोगावर होत असलेल्या आरोपांवरून सध्या देश ढवळून निघालेला आहे. विरोधकांनीही या आरोपांना लावून धरत मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. निवडणूक आयोगाने SIR तसेच इतर निर्णय सत्ताधारी पक्षाच्या हितासाठी घेण्यात आला, असा आरोप होतोय. या एका मुद्द्यामुळे सध्या विरोधक आक्रमक आहेत. देशातील तरुणाईही याच मुद्द्यावरून रस्त्यावर उतरलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही यात लक्ष्य केलं जातंय. दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना रागात येत मोदी यांच्या वडिलांवर एक विधान केले आहे. या विधानाची ऑडिओ क्लीप सध्या सगळीकडे व्हारयरल होतेय.
नेमकं काय घडलं?
मल्लिकार्जुन खरगे हे बिहार राज्यातील पटणा या शहरात होते. यावेळी एका कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. आपल्या भाषणात ते सत्ताधारी पक्षावर टीका करत होते. परंतु भाषण सुरू असतानाच प्रेक्षकांमधील एका व्यक्तीने खरगे यांच्या मध्येच बोलत ‘मोदी जाएगा नही’ म्हणजेच मोदी सत्तेतून जाणार नाहीत, असं विधान केलं. संबंधित व्यक्तीचे हे विधान ऐकताच खरगे आक्रमक झाले. त्यांनी भाषण सुरू असतानाच ‘मोदी का बाप भी जाएगा’ म्हणजेच फक्त मोदी नव्हे तर मोदींचा बापही सत्तेतून जाईल, अशा आशयाचे भाष्य केले. त्यांच्या याच विधानावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
#WATCH | A ruckus broke out during Congress national president Mallikarjun Kharge’s address at the 139th birth anniversary celebration of Dr. Shri Krishna Singh in Patna, Bihar
A person present at the event said that PM Modi would not go anywhere, Kharge responded, “Modi ka baap bhi jayega.”
— ANI (@ANI) October 25, 2026
उपस्थितांनी संबंधित व्यक्तीला चांगलाच चोप दिला
खरगे यांनी केलेल्या या विधानाची व्हिडीओ क्लीप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. हा व्हिडीओ पाहून भाजपा समर्थक खरगे यांच्यावर सडकून टीका करत आहेत. दुसरीकडे खरगे यांचे भाषण थांबवून मोदी नही जाएगा असे विधान केल्यामुळे उसस्थितांना राग अनावर झाला. संबंधित व्यक्तीला इतर प्रेक्षकांनी चांगलाच चोप दिला. त्याला मारहाण करण्यात आली. या घटनेचाही व्हिडीओही समोर आला आहे. दरम्यान, आता यावर भाजपाचे नेते नेमकी काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
