..... त्यासाठी जगातील श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स रांगेत उभे राहिले!

वॉशिंग्टन: जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स (Bill Gates) यांच्या साधेपणाचे अनेक किस्से आपण ऐकले आहेत. मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या अनेक कर्मचाऱ्यांनी बिल गेट्स हे सर्वात चांगले बॉस असल्याचं सांगितलं आहे. आता बिल गेट्स यांच्या एका फोटोने त्यांचा साधेपणा आणखी अधोरेखित केला आहे. व्हायरल होत असलेल्या एका फोटोमध्ये बिल गेट्स एका रेस्टॉरंटबाहेर रांगेत उभे असल्याचं दिसतं. …

..... त्यासाठी जगातील श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स रांगेत उभे राहिले!

वॉशिंग्टन: जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स (Bill Gates) यांच्या साधेपणाचे अनेक किस्से आपण ऐकले आहेत. मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या अनेक कर्मचाऱ्यांनी बिल गेट्स हे सर्वात चांगले बॉस असल्याचं सांगितलं आहे. आता बिल गेट्स यांच्या एका फोटोने त्यांचा साधेपणा आणखी अधोरेखित केला आहे. व्हायरल होत असलेल्या एका फोटोमध्ये बिल गेट्स एका रेस्टॉरंटबाहेर रांगेत उभे असल्याचं दिसतं. 8 डॉलर म्हणजेच जवळपास 500 रुपयांच्या बर्गर-फ्राई आणि कोकसाठी ते रांगेत उभे राहिल्याचं दिसून आलं. मायक्रोसॉफ्ट या बलाढ्य कंपनीचा मालक रांगेत उभं असल्याचं पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

आवडता बर्गर
बिल गेट्स यांचा हा फोटो मायक्रोसॉफ्टचा माजी कर्मचारी माईक गेलोसने फेसबुकवर शेअर केला आहे. बिल गेट्स यांना बर्गर खूपच आवडतो. त्यामुळे ते एका रेस्टॉरंटच्या बाहेर रांगेत उभे राहून बर्गर खरेदी करताना दिसले. माईक गेलोस यांनी या फोटोखाली लिहिलं, “तुम्ही अरबपती आहात, देशातील सर्वात मोठी चॅरिटी ट्रस्ट चालवता, तरीही बर्गरसाठी एका रेस्टॉरंटबाहेर रांगेत उभं राहतं.. तुमचं हे मोठेपण आहे”

ट्रम्पवर निशाणा
माईक गेलोसने अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही निशाणा साधला. “खरे श्रीमंत लोक हे सर्वसामान्यांप्रमाणे वागतात, ना की व्हाईट हाऊसमध्ये सोन्याच्या सीटवर बसून आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करतात” असं गेलोसने म्हटलं आहे.

हजारो लाईक्स, शेअर
फेसबुकवर या फोटोला हजारो लाईक्स आणि हजारो शेअर केले आहेत. हा फोटो अपलोड केल्यानंतर काही क्षणात 15 हजार लाईक्स आणि 12 हजारपेक्षा जास्त जणांनी शेअर केला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *