AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताची उडाली झोप! अमेरिका लावणार भारतावर तब्बल इतके टक्के टॅरिफ, मोठा दणका, थेट..

इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध पेटले आहे. मात्र, यादरम्यानच आता अमेरिकेने आपला मोर्चा हा रशियाकडे वळवला आहे. रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर तब्बल 500 टक्के टॅरिफ लावण्याच्या तयारीत अमेरिका आहे. तसा विधेयकही आणला जातोय.

भारताची उडाली झोप! अमेरिका लावणार भारतावर तब्बल इतके टक्के टॅरिफ, मोठा दणका, थेट..
Donald Trump
| Updated on: Jul 15, 2026 | 8:04 AM
Share

रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर अमेरिका मोठे निर्बंध लावताना दिसली. भारतावरही मोठा टॅरिफ काही दिवसांपूर्वीच लावण्यात आला होता. भारत हा रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करतो. त्यामध्येच इराण आणि अमेरिका यांच्या युद्धात जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे मोठे संकट आहे. या वाईट काळात भारताला रशियाने हवे तेवढ्या तेलाचा पुरवठा केला. आता इराणसोबतच्या युद्धात रशियावरील तेलावर टाकण्यात आलेले निर्बंध काही दिवसांकरिता अमेरिकेने स्थगित केले होते. आता पुन्हा त्यांनी आपला मोर्चा हा रशियाकडे वळवला आहे. रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर 500 टक्के टॅरिफ लावला जाऊ शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाच्या प्रतिबंध विधेयकाला पाठिंबा दिला आहे. जर हे बिल अमेरिकेच्या संसदेत मंजूर झाले तर रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांना थेट फटका बसेल.

चीन आणि भारत सर्वाधिक रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करतात. जे देश रशियाकडून तेल खरेदी करतात अशांवर 500 टक्के टॅरिफ लावला जाईल. जर अमेरिकेने भारतावर 500 टक्के टॅरिफ लावला तर मोठे नुकसान भारताला सहन करावे लागेल. व्हाईट हाऊसच्या रिपोर्टनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून या विधेयकाला समर्थन देण्यात आले.

भारत आणि चीनसारख्या मोठ्या ग्राहकांवर दबाव टाकण्यासाठीच अमेरिकेकडून हे पाऊस उचलले जातंय. रशियाला कोडींत कोणत्याही पद्धतीने अमेरिकेला अडकवायचे आहे. रशियाकडून तेल खरेदी करणारा प्रमुख देश भारत आहे. सध्या हे विधेयक अमेरिकेच्या सिनेटमध्ये विचाराधीन आहे. तिथे मंजुरी मिळाल्यानंतरच त्याचे कायद्यात रूपांतर होऊ शकेल.

काही रिपब्लिकन नेत्यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शविला असून हे विधेयक मंजूर होणार की नाही याकडे जगाच्या नजरा लागल्या आहेत. भारत हा रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याने भारतावर मोठा टॅरिफ यापूर्वी अमेरिकेने लावला होता. भारतावर मोठा टॅरिफ अमेरिकेने लावला होता. त्यावेळी दोन्ही देशातील संबंध तणावात होती. भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी करता पुन्हा टॅरिफ काढण्यात आला. इराण आणि अमेरिका युद्धात रशियाच्या तेलावरील निर्बंध हटवण्यात आली.

Follow Us