India-Canada Relation : कॅनडाचा खरा चेहरा उघड, त्यांच्या संसदेत दहशतवादी निज्जरला श्रद्धांजली

India-Canada Relation : येत्या 23 जूनला कनिष्क विमान दुर्घटनेला 40 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याच दरम्यान कॅनडाच्या संसदेने ही लज्जास्पद कृती केली आहे. भारताने हरदीप सिंह निज्जरला दहशतवादी घोषित केलं होतं. निज्जर कॅनडाच्या वँकूवर शहरातील गुरु नानक शीख गुरुद्वाराचा अध्यक्ष होता.

India-Canada Relation : कॅनडाचा खरा चेहरा उघड, त्यांच्या संसदेत दहशतवादी निज्जरला श्रद्धांजली
hardeep singh nijjar
Follow us
| Updated on: Jun 19, 2024 | 10:31 AM

दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती ठेवणारा कॅनडाचा खरा चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे. कॅनडाच्या संसदेने खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरसाठी दोन मिनिटांच मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. मागच्यावर्षी कॅनडामध्ये त्याची हत्या करण्यात आली होती. याआधी कॅनडाने एका नाजी लीडरला सन्मानित केलं होतं. हरदीप सिंह निज्जरच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण झालं. म्हणून कॅनडाच्या संसदेने मौन पाळून त्याला श्रद्धांजली वाहिली. येत्या 23 जूनला कनिष्क विमान दुर्घटनेला 40 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याच दरम्यान कॅनडाच्या संसदेने ही लज्जास्पद कृती केली आहे. भारताने हरदीप सिंह निज्जरला दहशतवादी घोषित केलं होतं.

खालिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची मागच्यावर्षी 18 जूनला एका गुरुद्वाराच्या पार्किंगमध्ये हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. हरदीप सिंह निज्जर कॅनडाच्या वँकूवर शहरातील गुरु नानक शीख गुरुद्वाराचा अध्यक्ष होता. हरदीप सिंह निज्जर खलिस्तान आंदोलनाशी जोडलेला भारतीय वंशाचा कॅनेडीयन शिख फुटीरतवादी नेता होता. भारत सरकारकडून त्याला दहशतवादी घोषित करण्यात आलं होतं. खालिस्तान टायगर फोर्स या दहशतवादी संघटनेशी तो संबंधित होता.

निज्जर काय करायचा?

फुटीरतावादी हरदीप सिंह निज्जरचा पंजाबच्या जालंधरमधील भार सिंह पुरा गावात जन्म झाला. 1990 च्या दशकात निज्जर कॅनडात रहायला गेला. तिथूनच तो भारतविरोधी कारवायाच करायचा. निज्जर खालिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख होता. खलिस्तान टायगर फोर्सच्या सदस्यांना मदत, नेटवर्किंग, ट्रेनिंग आणि आर्थिक मदत करायचा. या संघटनेने नेहमीच स्वतंत्र खलिस्तानची मागणी केली आहे.

काय होतं सिख रेफरेंडम 2020?

निज्जरने स्वतंत्र खलिस्तान देशासाठी “सिख रेफरेंडम 2020” म्हणून ऑनलाइन अभियान चालवलं होतं. एका प्रकरणात 2020 साली त्याची पंजाबमध्ये संपत्ती जप्त करण्यात आली. तो शीख फॉर जस्टिसशी सुद्धा संबंधित होता.

भारतावर काय आरोप केलेला?

कॅनडाने नेहमीच भारतविरोधी आणि फुटीरतावादी नेत्यांच समर्थन केलय. मागच्यावर्षी सप्टेंबरमध्ये कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारताचा दौरा केला होता. ते इथे G20 शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी आले होते. भारताचा दौरा केल्यानंतर 18 सप्टेंबरला त्यांनी कॅनडाच्या संसदेत वक्तव्य केलं होतं. निज्जरच्या हत्येमध्ये भारत सरकार सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.