Captain Smit Machchhar: 180 प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या चेंबूरच्या कॅप्टनची प्रकृती कशी आहे? मोठी अपडेट समोर

भारतीय पायलट स्मित माछर यांनी फ्लाईदुबईच्या फ्लाइटमध्ये ओमानच्या को-पायलटला प्लेन क्रॅश करण्यापासून रोखले आणि १८० प्रवाशांचे प्राण वाचवले. दरम्यान, त्यांना मार लागला. आता त्यांची प्रकृती कशी आहे?

Captain Smit Machchhar: 180 प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या चेंबूरच्या कॅप्टनची प्रकृती कशी आहे? मोठी अपडेट समोर
smit-machchhar
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 01, 2026 | 11:31 AM

दुबईहून इस्त्रायलला जाणारे विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. भारतीय पायलट स्मित माछर यांनी फ्लाईदुबईच्या फ्लाइटमध्ये ओमानच्या को-पायलटला प्लेन क्रॅश करण्यापासून रोखले आणि १८० प्रवाशांचे प्राण वाचवले. दरम्यान, पायलट स्मित माछर जखमी झाले. आता त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमकं काय म्हणाले जाणून घेऊया…

स्मित माछर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी, “ज्या लोकांनी माझ्यासाठी प्रार्थना केली, मला पाठिंबा दिला आणि प्रेम व प्रोत्साहनाचे संदेश पाठवले, त्या सर्वांचा मी अत्यंत ऋणी आहे. माझे सहकारी भारतीय, माझे सह-कर्मचारी, प्रवासी, विमान कर्मचारी आणि जगभरातील ज्यांनी या कठीण काळात मला साथ दिली, त्या सर्वांचे मी आभार मानतो असे म्हटले.”

Loading...

पुढे ते म्हणाले की, “एक वैमानिक म्हणून मी केवळ माझे कर्तव्य बजावत होतो. विमान सुरक्षितपणे उतरले आणि सर्वजण सुरक्षित आहेत, याबद्दल मी कृतज्ञ आहे. तुमच्या प्रार्थना आणि पाठिंब्याचे महत्त्व मला शब्दांत मांडता येणार नाही, ते माझ्यासाठी अत्यंत मोलाचे आहे.” पण स्मित माछर यांचे हे अधिकृत खाते आहे की दुसरं कोणी वापरत आहे? याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच टीव्ही  मराठी याची पृष्ठी करत नाही.

फ्लायदुबईच्या फ्लाइटमध्ये काय घडले?

फ्लायदुबईची फ्लाइट FZ1073 दुबईहून इस्रायलच्या तेल अवीवकडे निघाली आणि नंतर कॉकपिटमध्ये पायलट स्मित माछर आणि ओमानी को-पायलट यांच्यात भांडण झाले. यानंतर विमान सौदी अरेबियातील तबूककडे वळवण्यात आले, जिथे ते सुरक्षितपणे उतरले. फ्लायदुबईने पुष्टी केली की सर्व प्रवासी आणि क्रू सदस्य सुरक्षित आहेत.

इस्रायली अधिकाऱ्यांनी आणि प्रवाशांच्या अहवालांनुसार, या घटनेत दोन्ही पायलॉटमध्ये झटापट झाली. आरोप आहे की को-पायलटने कॅप्टन स्मित माछर यांना मारले. प्रवाशांच्या साक्षीनुसार, विमानाच्या कॉकपिटमध्ये गोंधळाचे वातावरण होते. जेव्हा विमानाने ७५०० ट्रान्सपॉन्डर कोड पाठवला, जो सामान्यतः अपहरण किंवा बेकायदेशीर हस्तक्षेप दर्शविण्यासाठी वापरला जातो, तेव्हा परिस्थिती आणखी चिंताजनक झाली.

को-पायलटवर विमान क्रॅश करण्याचा संशय

दावा आहे की ओमानी को-पायलटवर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय होता आणि त्यामुळेच भारतीय कॅप्टनशी त्याची झटापट झाली होती, कारण कॅप्टन प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी त्याच्याशी भिडले. को-पायलटशी लढत राहिले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us