युद्ध थांबलं अन् भारताचं नशीबच पालटलं, गॅस ते पेट्रोल सगळं स्वस्त… मोठी अपडेट समोर!

अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी झाली आहे. दोन्ही देशांनी दोन आठवड्यांसाठी ही शस्त्रसंधी केली आहे. त्याचा परिणाम भारतावर होणार आहे. भारतात अनेक गोष्टी स्वस्त होणार आहेत.

युद्ध थांबलं अन् भारताचं नशीबच पालटलं, गॅस ते पेट्रोल सगळं स्वस्त... मोठी अपडेट समोर!
narendra modi and petrol and lpg
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 08, 2026 | 3:35 PM

Iran America Ceasefire : अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांत दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी झाली आहे. या शस्त्रसंधीनंतर इराणी नागरिक तसेच जगभरातून आनंद व्यक्त केला जात आहे. होर्मुझची समुद्रधुनी खुली न केल्यास आम्ही इराणला नेस्तनाबूत करून टाकू, अशी उघड धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. परंतु अमेरिकेने प्रत्यक्ष हल्ल्यांना सुरुवात करण्याआधीच ही शस्त्रसंधी झाली आहे. दरम्यान, आता या शस्त्रसंधीमुळे मोठा नरसंहार टळला आहे. सोबतच आता संपूर्ण जगभरात अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत. या वस्तू कोणत्या आहेत? भारतातही नेमकं काय स्वस्त होणार आहे? ते जामून घेऊ या…

कच्च्या तेलाच्या किमतीत 13 ते 17 टक्क्यांनी घसरण

इराण आणि अमेरिकेत शस्त्रसंधी घडून येताच त्याचा पहिला परिणाम हा कच्च्या तेलाच्या किमतीवर पडला आहे. दोन्ही देशांतील तणाव कमी होताच कच्च्या तेलाच्या किमतीत 13 ते 17 टक्क्यांनी घसरण झाली आहे. कच्च्या तेलाची किंमत घसरल्यामुळे आता इंधनाची वाढलेली किंमत कमी होऊ शकते.

भारतावर काय परिणाम होणार?

इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांत शस्त्रसंधी झाल्यामुळे आता भारताला भासणारी कच्च्या तेलाची कमतरता संपू शकते. म्हणजेच कच्चे तेल मिळाल्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलची किंमत कमी होऊ शकते. हा परिणाम येत्या 7 ते 10 दिवसांत दिसू लागेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाची किंमत अशीच कमी राहिली तर भारतात इंधनाचा भाव कमी होऊ शकतो.

गॅस होऊ शकतो स्वस्त

एलपीजीच्या बाबतीतही भारताला लवकरच चांगली खुशखबर मिळू शकते. एलपीजीच्या कमतरतेमुळे भारतात गॅसची टंचाई भासत होती. गॅस सिलिंडरची किंमतही वाढली होती. आता मात्र एलपीजीचा पुरवठा सुरळीत होऊ शकतो आणि एलपीजीची किंमतही कमी होऊ शकते. एलपीजीची किंमत कमी झाल्याने खाद्यपदार्थांची किंमतही कमी होऊ शकते. हॉटेलमध्ये मिळणाऱ्या जेवणाची किंमतही कमी होण्याची शक्यता आहे. भारतात फळभाज्या, दूध, धान्याचीही किंमत कमी होण्याची शक्यता आहे. घरात वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकच्या वस्तूंची किंमतही कमी होण्याची शक्यता आहे.

Follow Us