India-China : आपल्याला युद्ध पातळीवर पावलं उचलावीच लागतील, चीनच्या घातक J-20 स्टेल्थ जेट बद्दल टेन्शन वाढवणारी माहिती आली बाहेर

India-China : चीनच्या सर्वात घातक J-20 स्टेल्थ जेट बद्दल भारताचं टेन्शन वाढवणारी माहिती समोर आली आहे. भारताने युद्ध पातळीवर हालचाल करणं गरजेच आहे. तशी पावलं आपल्याला उचलावी लागतील. डिफेन्स एक्सपर्ट अँड्रियास प्रेख्त यांनी जे लिहिलय ते खूप महत्वाचं आहे.

India-China : आपल्याला युद्ध पातळीवर पावलं उचलावीच लागतील, चीनच्या घातक J-20 स्टेल्थ जेट बद्दल टेन्शन वाढवणारी माहिती आली बाहेर
stealth fighters
| Updated on: Jul 17, 2026 | 12:11 PM

मागच्या काही वर्षात चीनने बऱ्याच क्षेत्रात प्रगती केली आहे. त्यात संरक्षण उत्पादन क्षेत्रातही मोठी मजल मारली आहे. नुकतचं जागतिक एअर फोर्सचं रँकिंग जाहीर झालं. त्यात भारत चीनच्या पुढे आहे. युद्धकाळात भारताची ऑपरेशनल क्षमता चीनपेक्षा जास्त आहे. पण चीनच्या ताफ्यात अशी काही लढाऊ विमानं आहेत, ज्याचं उत्तर भारताकडे अजूनही नाहीय. चीनने स्टेल्थ फायटर जेट निर्मितीच्या क्षेत्रात प्रगती केली आहे. चीनकडे आजच्या घडीला J-20 स्टेल्थ फायटर जेट्स आहेत. ही पाचव्या पिढीची विमानं आहेत. चीनच्या लष्करी क्षमतेवर लक्ष ठेऊन असणारे डिफेन्स एक्सपर्ट अँड्रियास प्रेख्त यांनी अमेरिकी डिफेन्स जर्नल ‘द वॉर झोन’ मध्ये लिहिलय की, चीनकडे सध्याच्या घडीला जवळपास 500 ऑपरेशनल J-20 स्टेल्थ फायटर जेट्स असू शकतात.

स्टेल्थ विमान निर्मिती सोपी नाहीय. हे एक जटिल तंत्रज्ञान आहे. चीनने स्टेल्थ विमान उत्पादनाचं प्रमाण इतकं वाढवलं आहे की ते अमेरिकेच्या पुढे जाऊ शकतात. अँड्रियास प्रेख्त यांनी वर्तवलेला हा अंदाज भारतासाठी खरंच चिंतेची बाब आहे. कारण भारताकडे सध्याच्या घडीला एकही स्टेल्थ फायटर विमान नाहीय. उद्या दोन्ही देशांमध्ये युद्धाच प्रसंग उदभवल्यास चिनी एअरफोर्सचा सामना करणं कठीण होऊ शकतं. चीनने काही जे-20 फायटर जेट्स तिबेटमध्ये तैनात केल्याचं वृत्त एनडीटीव्हीने दिलं होतं. तिबेटची सीमा भारतापासून लांब नाहीय. स्टेल्थ विमानांचं वैशिष्ट्य म्हणजे ही विमानं सहज रडारला पकडता येत नाहीत. शत्रुच्या प्रदेशात खोलवर हल्ला करता येतो.

ही विमान सेवेत यायला अजून 10 वर्ष लागतील

सध्याच्या आधुनिक युद्धकाळात स्टेल्थ फायटर विमानं युद्धभूमीच चित्र बदलू शकतात. शत्रुच्या विमानांना हुडकून नष्ट करणं, एअर डिफेन्स सिस्टिम उद्धवस्त करणं ही काम हे जेट्स सहज करु शकतात. भारताच AMCA हा पाचव्या पिढीच्या फायटर जेटचा कार्यक्रम आत्ता सुरु झालाय. ही विमान सेवेत यायला अजून 10 वर्ष लागतील. रशियाचं SU-57 हे स्टेल्थ फायटर जेटवर तितक्य भरवशाचं नाहीय. फक्त सध्या इमर्जन्सी म्हणून ते विकत घेण्याचा पर्याय आहे.

 

 

 

Follow Us