चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा धोका, दिवसाला 36 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

चीनमधील परिस्थती पूर्वपदावर येत असताना (China once again danger of coronavirus) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीनमध्ये एकाच दिवशी 36 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा धोका, दिवसाला 36 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
Follow us
| Updated on: Apr 02, 2020 | 11:22 AM

बीजिंग : चीनमधील परिस्थिती पूर्वपदावर येत असताना (China once again danger of coronavirus) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीनमध्ये एकाच दिवशी 36 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे चीनवर पुन्हा कोरोनाचं संकंट ओढवण्याची भीती वर्तवली जात आहे. दरम्यान, हे संकंट ओढवू नये म्हणून चीन प्रशासन पुन्हा एकदा सज्ज झालं आहे. ज्या शहरात कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत ते शहर पूर्णपणे लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे (China once again danger of coronavirus).

चीनच्या ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’मध्ये (South China Morning Post) याबाबत माहिती देण्यात आली. चीनच्या हेनान प्रांतात 36 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण बाहेरुन प्रवास करुन आलेले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहे.

चीनच्या पिंगडिंगशन शहरात जिया काउंटी या भागाची लोकसंख्या जवळपास 6 लाखांपेक्षाही जास्त आहे. कोरोनाचं संकंट लक्षात घेऊन प्रशासनाने सर्व नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. एखाद्याला खरंच अतिशय महत्त्वाचं काम असेल तर त्यासाठीही प्रशासनाची मंजुरी घ्याली लागेल. त्याशिवाय घरातून बाहेर पडता येणार नाही.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव सर्वात अगोदर चीनमध्ये झाला. चीनच्या वुहान शहरात कोरोनामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली. हजारो लोकांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर संपूर्ण जगभरात कोरोना पसरला. दरम्यान, चीनमध्ये कोरोनामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला. मात्र, चीनी प्रशासनाने कोरोनावर नियंत्रण मिळवले. मात्र, हेनान प्रांतात सापडलेल्या नव्या रुग्णांनी चीनची पुन्हा एकदा डोकेदुखी वाढवली आहे.

दरम्यान, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी चीनला पूर्वपदावर आणण्यासाठी सर्व आवश्यक पाऊल उचलेल जाणार, असं आश्वासन दिलं आहे. याबाबत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी ताकीद जिनपिंग यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिली आहे.

संबंधित बातम्या :

जगात एका दिवसातील सर्वाधिक ‘कोरोना’बळी, 24 तासात 4 हजार 883 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

महाराष्ट्रातील ‘कोरोना’ग्रस्तांचा आकडा 341 वर, कुठे किती रुग्ण सापडले?

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.