AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता थेट युद्धाला सुरुवात? चीन संतापला, या देशासह अमेरिकेलाही दिली थेट धमकी

China vs USA : चीनने दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला थेट इशारा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात या देशांमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे. हे प्रकरण काय आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.

आता थेट युद्धाला सुरुवात? चीन संतापला, या देशासह अमेरिकेलाही दिली थेट धमकी
Trump-and- china
| Updated on: Nov 17, 2025 | 9:23 PM
Share

जागतिक पातळीवर सध्या अशांतता आहे. बरेच देश अमेरिकेवर नाराज आहेत. अशातच आता चीनने आक्रमक विधान करत दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला थेट इशारा दिला आहे. यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. चीनने म्हटले की, ‘अमेरिका आणि दक्षिण कोरियाने एकत्रित बनवलेल्या अणु पाणबुड्यांचा वापर केला तर आम्ही गप्प बसणार नाही.’ अमेरिकेच्या नौदलाच्या एका अधिकाऱ्याच्या विधानानंतर चीनने हे विधान केले आहे.

चीनचा अमेरिकेला इशारा

अमेरिकेचे अ‍ॅडमिरल डॅरिल कॉडल यांनी दक्षिण कोरियाने तयार केलेल्या पाणबुड्या चीनच्या सामना करण्यासाठी फायदेशीर ठरतील असं विधान केले होते. याला उत्तर देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग म्हणाले, ‘दक्षिण कोरिया आणि अमेरिका हे प्रकरण काळजीपूर्वक हाताळतील अशी आशा आहे.’ तसेच दक्षिण कोरियातील चीनचे राजदूत दाई बिंग यांनी म्हटले की, ‘दक्षिण कोरिया आणि अमेरिकेने चीनला रोखण्याच्या उद्देशाने अशी युती करू नये, कारण यामुळे त्यांना उत्तर कोरियाच्या धोक्यांना तोंड देणे अवघड जाईल.’

चीनही आक्रमक पवित्रा घेणार

चीनचे सरकारी वृत्तपत्र, ग्लोबल टाइम्सने दाई बिंग यांच्या हवाल्याने म्हटले की, ‘जर दक्षिण कोरिया-अमेरिका युतीच्या उद्दिष्टात बदल झाला तर या युतीबद्दल चीनचा दृष्टिकोनही बदलेल.’ कारण याआधी अमेरिकेचे अ‍ॅडमिरल डॅरिल कॉडल यांनी दक्षिण कोरियाच्या मीडियाला सांगितले होते की, ‘मोठ्या शक्तीसोबत मोठी जबाबदारी येते. चीनचा सामना करण्यासाठी त्या पाणबुडीचा वापर करणे ही एक नैसर्गिक अपेक्षा आहे असे मला वाटते.’ यामुळे आता चीनने आक्रमक पवित्रा घेत या दोन्ही देशांना थेट धमकी दिली आहे.

आगामी काळात तणाव वाढण्याची शक्यता

दरम्यान, गेल्या आठवड्यात दक्षिण कोरियाने अमेरिकेसोबत पार्टनरशीपमध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्या बांधण्याचा करार अंतिम झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता अमेरिकेने या पाणबुड्यांच्या माध्यमातून चीनवर नियंत्रण ठेवण्याची भाषा केल्याने चीनने चोख प्रत्युत्तर देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांमध्ये या देशांमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ