AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानचा घोर अपमान, युद्ध आम्हीच थांबवलं म्हणणाऱ्या शाहबाज यांना चीननं दाखवला आरसा; तब्बल 26 वेळा…

अमेरिका-इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी झालेली आहे. त्यानंतर आता इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजांना जाऊ देण्यास सहमती दर्शवली आहे. या शस्त्रसंधीमागे चीनची भूमिका आता समोर आली आहे.

पाकिस्तानचा घोर अपमान, युद्ध आम्हीच थांबवलं म्हणणाऱ्या शाहबाज यांना चीननं दाखवला आरसा; तब्बल 26 वेळा...
shehbaz sharifImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 08, 2026 | 4:23 PM
Share

America Iran Ceasefire : अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी झाली आहे. या शस्त्रसंधीनुसार दोन्ही देश पुढील दोन आठवड्यांसाठी एकमेकांवर हल्ले करणार नाहीत. या शस्त्रसंधीनंतर इराणनेही होर्मुझच्या समुद्रधुनीतून व्यापारी जहाजांना जाऊ देण्यास सहमती दर्शवली आहे. ही शस्त्रसंधी होताच जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत 17 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. शस्त्रसंधीनंतर संपूर्ण जगावरील उर्जासंकट टळल्याची भावना व्यक्त केली जात आहे. ही शस्त्रसंधी प्रत्यक्षात होण्यासाठी पाकिस्तानने मोठी भूमिका बजावल्याचे सांगितले जात होते. परंतु आता चीनने समोर येत पडद्यामागे काय काय घडलं? याची सविस्तर माहिती दिली आहे.

शस्त्रसंधीत चीनची नेमकी भूमिका काय आहे?

युद्ध सुरू झाल्यानंतर 40 व्या दिवशी अखेर इराण-अमेरिका यांच्यात शस्त्रसंधी झाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे आम्ही या शस्त्रसंधीसाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे, ससे सांगत आहेत. परंतु आता चीनने समोर येत शस्त्रसंधीची खरी कहाणी सांगितली आहे. खुद्द अमेरिकेचे राष्ट्रआध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील चीनच्या या भूमिकेचा उल्लेख केला. इराण युद्ध सुरू झाल्यानंतर शांततेसाठी तसेच संघर्ष थांबवण्यासाठी चीन सातत्याने प्रयत्न करत आहे, असे चीनच्या पराराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी म्हटले आहे.

चीनच्या मंत्र्यांने केला 26 वेळा कॉल

ही शस्त्रसंधी घडून यावी यासाठी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यांनी अमेरिका आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांना एकूण 26 वेला कॉल केले. तसेच मध्य पूर्वेतील वादाच्या मुद्द्यावर चीन सरकारच्या विशेष दूतानेही दोन्ही देशांत राजनैतिक चर्चा घडवूनन आणली, असेही माओ यांनी सांगितले. तसेच मध्य पूर्वेत शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी चीन आणि पाकिस्तानने संयुक्तपणे पाच सूत्री प्रस्ताव ठेवला आहे, असेही माओ म्हणाले आहेत. एक जबाबदार देश म्हणून आम्ही आखाती प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी कार्यरत राहू, असेही त्यांनी सांगितले.

ट्रम्प यांनी केला चीनचा उल्लेख

दरम्यान, खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनीही चीनच्या योगदानाचा उल्लेख केला. डोनाल्ड ट्रम्प मंगळवारी (7 एप्रिल) एएफपी या न्यूज एजन्सीसोबत बोलत होते. यावेळी बोलताना चीननेच इराणला शस्त्रसंधीसाठी तयार केले. तसेच चीनमुळेच इराण चर्चेसाठी तयार झाला, असे सांगितले होते.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?