दीर्घायुष्यावर भाषण करताना 65 वर्षीय व्यक्तीचा स्टेजवरच मृत्यू

औषध कंपनीच्या 65 वर्षीय अध्यक्षाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. जेव्हा त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला तेव्हा ते मंचावर दीर्घायुष्यावर टीप्स देत होते.

दीर्घायुष्यावर भाषण करताना 65 वर्षीय व्यक्तीचा स्टेजवरच मृत्यू

बीजिंग : औषध कंपनीच्या 65 वर्षीय अध्यक्षाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. जेव्हा त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला तेव्हा ते मंचावर दीर्घायुष्यावर टीप्स देत होते. दक्षिण चीनमध्ये आयोजित एका कार्यक्रमात जेव्हा अध्यक्ष चेन पीवेन (Chen Peiwen) मंचावरच कोसळले तेव्हा तिथे उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

डेली मेलच्या बातमीनुसार, चेन पीवेन (Chen Peiwen) हे चीनमधील औषध कंपनी झॉन्गयी हेल्थ अॅण्ड टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष होते. ते गुआंगडॉन्ग येथील रहिवासी होते. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये ही कंपनी सुरु झाली. चेन झांगोझूमध्ये 17 नोव्हेंबरला कंपनीच्या प्रमोशन कार्यक्रमात सहभागी झाले होते. तिथेच त्यांना हृदयविकाराचा धक्का आला, अशी माहिती कंपनीच्या इतर कर्मचाऱ्यांनी दिली.

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये चेन हे मंचावर चालता चालता कोसळताना दिसत आहेत. ‘चेन त्यांचं भाषण संपवून कोसळले, चेन यांची 20 वर्षांपूर्वी एक हार्ट बायपास सर्जरी झाली होती. काही दिवसांनी ते रुग्णालयात तपासणीसाठी जाणार होते. मात्र, अचानक असं काही होईल याचा कोणी विचारही केला नसेल’, असं कंपनीचे संस्थापक वु तियानरॉन्ग यांनी सांगितलं.

Man dies while giving speech about how to live long life

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *