AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona – जगभराची खबरबात | मृतांचा आकडा एक लाखाच्या उंबरठ्यावर

महाराष्ट्रात काल सापडलेले कोरोनाचे 229 नवे रुग्ण, हे एका दिवसात आढळलेले सर्वाधिक आहेत. राज्यातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 1,364 वर पोहोचला आहे (Corona Cases in World Update)

Corona - जगभराची खबरबात | मृतांचा आकडा एक लाखाच्या उंबरठ्यावर
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Apr 10, 2020 | 8:50 AM
Share

मुंबई : ‘कोरोना व्हायरस’ने जगभर घातलेले थैमान कायम आहे. कालच्या दिवसात (9 एप्रिल) 7 हजार 183 रुग्ण दगावले. जगातल्या एकूण मृतांचा आकडा 96 हजारांवर पोहोचला आहे. अमेरिकेत काल 1858 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबई-पुण्यापासून अमेरिका-इटलीपर्यंत ‘कोरोना’ची कुठे काय स्थिती आहे, याचा हा आढावा (Corona Cases in World Update)

जगात काय स्थिती?

-जगभरात काल 7 हजार 183 कोरोना रुग्ण दगावले -जगातल्या मृतांचा एकूण आकडा 96 हजारांवर -जगभरात काल तब्बल 84 हजार 215 नवे रुग्ण समोर -जगभर कोरोनाचे 16 लाखांहून अधिक रुग्ण

अमेरिकेत कोरोनाचे थैमान

-अमेरिकेत कोरोनामुळे काल 1 हजार 858 रुग्णांचा मृत्यू -अमेरिकेत काल कोरोनाचे 33 हजार नवे रुग्ण समोर -अमेरिकेत सर्वाधिक 4 लाख 68 हजार रुग्ण -मंगळवारी 1,971; बुधवारी 1940; तर गुरुवारी 1,858 ‘कोरोना’बळी

युरोपीय देशांमध्ये कोरोनाची स्थिती

-फ्रान्समध्ये मृतांचा आकडा वाढताच -फ्रान्समध्ये काल एका दिवसात 1341 रुग्ण दगावले -फ्रान्समध्ये आतापर्यंत 12 हजार 210 रुग्णांचा मृत्यू -फ्रान्समध्ये एकूण रुग्णसंख्या 1 लाख 18 हजार

-ब्रिटनमध्येही काल 881 ‘कोरोना’बळी -एकूण मृतांचा आकडा 8 हजारांच्या जवळ -65 हजार ब्रिटीशांना कोरोनाची लागण

-इटली, स्पेन, जर्मनीत मृतदेहांचा खच -काल इटलीत 610, स्पेनमध्ये 655 मृत्यू -जर्मनीत 258 रुग्णांचे कोरोनामुळे प्राण गेले -स्पेनमध्ये एकूण 1.53 लाख, तर इटलीत 1.43 लाख रुग्ण

(Corona Cases in World Update)

भारतात रुग्ण वाढतेच

-देशभरात काल कोरोनाचे 61 बळी -देशभरातल्या कोरोनाबळींचा एकूण आकडा 227 वर -कोरोना रुग्णांची एकूण संख्याही 6 हजार 738 वर -भारतात काल 781 नवे रुग्ण समोर

महाराष्ट्रात फैलाव वाढला

-महाराष्ट्रात काल सर्वाधिक 229 नवे रुग्ण -राज्यातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 1,364 वर -महाराष्ट्रात काल कोरोनाचे 25 बळी -राज्यात कोरोनाबळींची संख्या 97 वर

-पुणे विभागात कोरोनाग्रस्तांची संख्या 246 वर -काल 7 रुग्ण दगावले तर 53 नवे रुग्ण समोर -पुणे विभागातील मृतांचा आकडा 25 वर

-मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 857 वर -मुंबईत एकूण 46 जणांचा कोरोनामुळे मृत्यू -मुंबईत काल 143 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ

-कोरोनासंबंधी मुंबईतून धक्कादायक बातमी -लहान मुलेही कोरोनाच्या विळख्यात -कोरोनाच्या रुग्णांमध्ये 21 चिमुरडे -1 ते 10 वयोगटातल्या 21 मुलांना संसर्ग -11 ते 20 वयोगटातही 56 मुलांना कोरोना

-विदर्भात काल एका दिवशी 22 नवे रुग्ण -अकोल्यात सर्वाधिक 11 नवे रुग्ण -नागपुरात 6, बुलडाण्यात 5 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

(Corona Cases in World Update)

Follow Us
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस!
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस! स्कूल व्हॅनमध्ये...
मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन
Mumbai DJ Ban | मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन भारतींची मोठी घोषणा
मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
Dahi Handi in Mumbai | कालपर्यंत परवानगी, रात्री अचानक नकार! मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना दिलासा!
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! सारथी शिष्यवृत्तीवरील खर्च मर्यादेवर मोठा निर्णय
मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष
Thackeray Group Dahihandi | मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष बघाच
जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत आंदोलकांची मोठी गर्दी
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत मराठा आंदोलकांची मोठी गर्दी
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह बघाच
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह; मध्यरात्री बाळकृष्णाचा जन्मसोहळा, मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका