AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संतापलेल्या जमावाने दुकानं लुटली, इमारती पेटवल्या; 1,200 हून अधिक जणांना अटक, नेमकं काय घडलं?

महागाईचा भडका उडाला आणि रस्त्यांवर संतापाचा उद्रेक झाला, आंदोलनाला हिंसक वळण, दुकानांची तोडफोड आणि जाळपोळ पाहायला मिळाली आहे. पेट्रोल, वीज आणि अन्नधान्याच्या वाढत्या किमतींमुळेही लोकांचा संताप वाढला आहे.

संतापलेल्या जमावाने दुकानं लुटली, इमारती पेटवल्या; 1,200 हून अधिक जणांना अटक, नेमकं काय घडलं?
शांततेत सुरू झालेलं आंदोलन अचानक चिघळलंImage Credit source: social media
| Updated on: Oct 18, 2026 | 4:47 PM
Share

महागाईचा फटका सातत्याने बसल्यानंतर लोक रस्त्यावर उतरले. मोठ्या प्रमाणावर निदर्शन केली जात आहेत. प्रचंड जनक्षोभ आणि हिंसाचार होत आहे. जाळपोळीच्या घटनांनी शहर हादरले आहे. संतप्त आंदोलकांनी दुकानं लुटली आणि वाहनं मालमत्ता जाळून टाकली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. अश्रुधूर आणि पाण्याचे फवारे वापरले. हे सर्व युरोपातील इटली आणि फ्रान्समध्ये घडत आहे. पोलिसांनी फ्रान्समध्ये आतापर्यंत या आंदोनलातून २७२ जणांना अटक केली आहे. तर इटलीतील मिलान शहरातून ५० आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

काल म्हणजे शनिवारी मिलान शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये पोलिसांशी नागरिकांचा संघर्ष झाला. त्यानंतर त्यांनी दुकाने लुटली, इमारतींना थेट आग लावली असल्याचा दावा केला जात आहे. पण या हिंसाचारामुळे उच्चभ्रू परिसरातील बाजारपेठा ओस पडल्या आहेत. सुरुवातील महागाईविरोधात सुरु केलेले हे आंदोलन शांततेत सुरु होतं पण नंतर मुखवटे घालून आलेल्या काही आंदोलकांनी अचानक हिंसाचार करायला सुरुवात केली. पोलिसांवर त्यांनी दगड आणि इतर वस्तू फेकल्या. त्यानंतर पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी पाण्याचे फवारे आणि अश्रुधुराचा वापर केला.

दोन पोलिस जखमी झाले असल्याचे वृत्तही समोर आले आहे. पोलिसांनी याववेळी अनेक अल्पवयीन मुलांसह सुमारे ५० आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जियो मेलोनी यांनी या हिंसाचाराचा निषेध केला आहे. त्यांनी लिहिलं की, “आंदोलन करणे हा हक्क आहे. शहरांना आग लावण्याचा तुम्हाला हक्क नाही.उपद्रवी लोक आंदोलनाचा फायदा घेऊन गोंधळ पसरवतात, सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला करतात आणि संपूर्ण शहरांना ओलीस ठेवतात”, असंही त्यांनी पुढे आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. मिलानचे महापौर ज्युसेप्पे सेला म्हणाले, “कायदा अंमलबजावणी करणाऱ्यांविरुद्ध हिंसाचार करणे आणि शहराचे मोठे नुकसान हे कधीही समर्थनीय नाही.”

फ्रान्समध्येही वाढत्या महागाईविरोधात मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली, ज्यात हिंसक घटनांचाही समावेश होता. राजधानी पॅरिसमध्ये गाड्या जाळण्यात आल्या आणि दुकाने लुटण्यात आली. देशभरातून किमान २७२ जणांना अटक करण्यात आली. दरम्यान, देशाच्या अनेक भागांमध्ये पोलिसांवर हल्ले, लूटमार आणि सार्वजनिक इमारतींचे नुकसान झाल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. ल्योनमधील एका पर्यटन कार्यालयात आग लागली, तर मार्सेलमध्ये दुकाने आणि एका महानगरपालिका पोलीस ठाण्याचे नुकसान झाले. काही आंदोलकांनी तर महापालिकेच्या लॉबीमध्येही प्रवेश केल्याची माहिती फ्रान्सच्या गृहमंत्री कार्यालयाने दिली आहे.

पेट्रोल, वीज आणि अन्नधान्याच्या वाढत्या किमतींमुळेही लोकांचा संताप वाढला आहे. यापूर्वी, २ ऑक्टोबर रोजी फ्रान्समधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. सरकारविरोधात निषेध करण्यासाठी लाखो शालेय विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. शाळांची प्रवेशद्वारे बंद करण्यात आली. अनेक ठिकाणी तोडफोड झाली. सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. अनेक ठिकाणी त्यांचा फ्रेंच पोलिसांशी संघर्ष झाला. पोलिसांना अश्रुधूर आणि लाठीचार्जचा वापर करावा लागला. या दरम्यान, २,००० हून अधिक विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली होती.

Follow Us
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
पदवीधर निवडणुकीत विजयाचा विश्वास! कैलास पाटील म्हणाले, ठाकरे गट...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड...
आयआयटी मुंबईत साहिल वाकोडे प्रकरणी आंदोलन; अस्लम शेख, वर्षा गायकवाड सहभागी,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट,
मोठी बातमी! स्मिता जाधवांना पाठिंबा देण्यावर शंभूराज देसाईंची मोठी अट, महायुतीत धुसफूस कायम
राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं..
Aamir Khan Meet Raj Thackeray : राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर आमिर खानची अचानक एन्ट्री; शिवतीर्थवर नेमकं काय घडतंय? कारण अद्याप गुलदस्त्यात
पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
Mumbai : पत्रकार असल्याचा धाक दाखवून खंडणीचा डाव; थेट बार मालकाकडे...
स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचा निशाणा
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray; स्वतःचे आमदार सांभाळू शकले नाहीत...; उद्धव ठाकरेंवर देवेंद्र फडणवीसांचा थेट निशाणा
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोहन भागवतांशी भेट; चर्चांना उधाण
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची मोहन भागवतांशी भेट; चर्चांना उधाण
कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
Gokul Milk Union Election 2026 : कोल्हापुरात गोकुळ दूधसंघ निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार
उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं...
Navnath Ban : उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षातील रेजिम चेंजकडे लक्ष द्यावं; नवनाथ बन यांचा ठाकरे-राऊतांवर निशाणा
प्रसिद्ध Maple लॉन अँड रेस्टॉरंटचा अन्न परवाना निलंबित; तपासणीत 96....
Chhatrapati Sambhajinagar : प्रसिद्ध Maple लॉन अँड रेस्टॉरंटचा अन्न परवाना निलंबित; तपासणीत 96 पैकी फक्त....