AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

iran us conflict : अमेरिकेचे वॉरशिप ‘टॉयलेट वॉर’ने बेजार, 4500 नौदल कर्मचाऱ्यांची का झाली दैनावस्था ?

इराण आणि अमेरिकेत तणावाचे वातावरण असताना अमेरिकन विमानवाहू युद्धनौका यूएसएस जेराल्ड हिला एका वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अमेरिकन खलाशांना शौचासाठी रोज ४५ मिनिटे रांगेत उभे रहावे लागत आहे.

iran us conflict : अमेरिकेचे वॉरशिप 'टॉयलेट वॉर'ने बेजार, 4500 नौदल कर्मचाऱ्यांची का झाली दैनावस्था ?
American aircraft carrier USS Gerald
| Updated on: Feb 24, 2026 | 8:32 PM
Share

मध्य पूर्वेत इराण संदर्भात मोठा तणाव वाढला आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यानंतर इराण काही जेरीस येत नाहीए..अशी स्थिती असताना अमेरिकेची विमानवाहू नौका USS गेराल्ड फोर्डमध्ये अमेरिकेचे नाविक वेगळ्यास समस्येशी लढत आहेत. ही समस्या युद्ध नसून या विमानवाहू नौकेच्या टॉयलेट आणि सांडपाण्याच्या संदर्भातील आहे. सुमारे १३.३ अब्ज डॉलरची ही जगातील सर्वात महागडी युद्धनौका आहे. यावर ४,५०० नाविक कर्मचारी तैनात आहे. परंतू या विमानवाहू नौकेतील ६५० टॉयलेट खराब व्हायचे.

या विमानवाहू नौकेतील सीवेज सिस्टीम फेल झाल्याने गोंधळ उडाला आहे. व्हेनेझुएलावर अमेरिकेने कारवाई केली त्यावेळी या युद्धनौकेने मोठी कामगिरी बजावली. मात्र, त्यानंतर आता इराणचे संकट ओढवल्याने ही विमानवाहू युद्धनौका अजूनही समुद्रात तैनात आहे. कोणत्याही विमानवाहू युद्धनौका सर्वसाधारण सहा महिन्यांसाठी मोहिमेवर असतात. परंतू या युद्धनौकेला आठ महिन्यांहून अधिक काळ समुद्रावरच रहावे लागल्याने त्यात सांडपाणी वाहून नेण्याची यंत्रणा चोकअप झाली आहे. या विमानवाहू युद्धनौकतील टॉयलेट व्हॅक्युम पद्धतीचे असल्याने एक खराब झाले तर सर्वच टॉयलेट चोकअप होतात. त्यामुळे नौदलाच्या जवानांना रोज ४५ मिनिटे टॉयलेटसाठी रांगा लावाव्या लागत आहेत. प्लबिंग आणि दुरुस्ती करणारे तंत्रज्ञ रोज १९ तास काम करत आहेत. तरीही समस्या नीट होत नाहीए. गेल्या वर्षी चार दिवसात २०५ टॉयलेट खराब झाले होते.

टॉयलेटमध्ये का समस्या?

युद्धनौकेवर व्हॅक्युम आधारित सीवेज सिस्टीम असल्याने एक वॉल्व जरी खराब झाला तर संपूर्ण विभागाचे टॉयलेट बंद होतात. पाईपमध्ये कॅल्शियम साचल्याने देखील समस्या येत आहे. त्यामुळे पातळ पाईप लाईन नीट करण्यासाठी यात एसिड फ्लश करावे लागते. त्यामुळे प्रत्येक वेळी एसिड फ्लश करण्याचा खर्च सुमारे ४ लाख डॉलर इतका आहे.

आठ महिन्यांपासून तैनात –

समुद्रावर आठ महिन्यांपासून दीर्घकाळ तैनात असल्यामुळे या युद्धनौकेवरील जवानांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. अनेक जवान २० ते २५ वर्षांचे असून कुटुंबापासून दूर राहिल्याने त्यांना नैराश्य आणि थकवा आला आहे.त्यामुळे अनेकांना सैन्यदल सोडण्याचा विचार केला आहे. गेल्या वर्षी USS हॅरी एस. ट्रूसमॅन युद्धनौकेची हीच हालत झाली होती. एप्रिल -मे २०२५ मध्ये लाल समुद्रात हुती बंडखोरांच्या विरोधात संघर्षात अनेक फायटर जेट गमावले होते. तपासात उघड झाले की अतिश्रम आणि वेगवान ऑपरेशनमुळे हे नुकसान झाले होते.

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...