AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सायरस ब्रोचाचा शो न्यूज9 वर प्रसारित होणार, दुबईतील ग्लोबल समिटमध्ये घोषणा

सायरस यांनी ‘द शौकीन्स’ आणि ‘रॉय’ सह अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सायरस हे 'बिग बॉस ओटीटी'च्या दुसऱ्या सीजनचा देखील भाग होते. त्यांनी अनेक कॉमेडी शो देखील केले आहेत. मनोरंजन क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं नाव आहे.

सायरस ब्रोचाचा शो न्यूज9 वर प्रसारित होणार, दुबईतील ग्लोबल समिटमध्ये घोषणा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 19, 2025 | 9:52 PM
Share

टीव्ही 9 नेटवर्कतर्फे दुबईमध्ये ‘न्यूज 9 ग्लोबल समिट’चं आयोजन करण्यात आलं आहे. विवेक ओबेरॉय, शालिनी पासी यासारखे दिग्गज या समिटमध्ये सहभागी झाले आहेत. न्यूज 9 ग्लोबल समिटमध्ये अभिनेता आणि कॉमेडियन सायरस ब्रोचा हे देखील सहभागी झाले आहेत. याचदरम्यान त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. लवकरच सायरस ब्रोचा हे News9 वर दिसणार आहेत. Newscaustic नावाचा त्यांचा एक शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सायरस यांनी ‘द शौकीन्स’ आणि ‘रॉय’ सह अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सायरस हे ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या सीजनचा देखील भाग होते. त्यांनी अनेक कॉमेडी शो देखील केले आहेत. मनोरंजन क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं नाव आहे. आता ते News9 वर दिसणार आहेत. त्यांच्या शोचं पूर्ण नाव Newscaustic: let’s roast with cyrus broacha, असं आहे. हा शो कधी प्रसारीत होणार? याबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाहीये, मात्र लवकरच त्या संदर्भात घोषणा होऊ शकते.

सायरस यांनी या ग्लोबल समिटमध्ये आपल्या नव्या शोबद्दल माहिती दिली. सोबतच त्यांनी आपल्या या शोचं टायटल (Newscaustic) चं क्रेडिट टीव्ही 9 चे सीईओ आणि एमडी बरुण दास यांना दिलं. टीव्ही 9 नेटवर्कतर्फे दुबईमध्ये ‘न्यूज 9 ग्लोबल समिट’चं आयोजन करण्यात आलं आहे. या समिटची थीम भारत-यूएई भागीदारी: समृद्धी आणि प्रगतीसाठी अशी आहे. यापूर्वी नोव्हेंबर 2024 मध्ये न्यूज 9 ग्लोबल समिटचं आयोजन जर्मनीमध्ये करण्यात आलं होतं. त्यावेळी देखील अनेक दिग्गज या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. त्यामध्ये सायरस ब्रोचा, विवेक ओबेरॉय, शालिनी पासी यांच्यासह एकता कपूर, सुनील शेट्टी, यासारखे अनेक दिग्गज या क्रार्यक्रमात सहभागी झाले होते.

जेव्हा विवेक ओबेरॉय News9 ग्लोबल समिटच्या मंचावर आले, तेव्हा त्यांनी TED स्टाईलमध्ये संवाद साधला. The Second Act असा त्यांचा टॉपिक होता. विवेक ओबेरॉय यांनी या माध्यमामधून कामाची व्हॅल्यू क्रियेट करण्याचं महत्त्व काय असंत हे सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही तुमच्या मनाचा आवाज ऐका त्यातून तुम्ही तुमचं ध्येय गाठू शकता असं त्यांनी यावेळी म्हटलं.

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.