दाऊद इब्राहिम पाकिस्तानच, हे घ्या पुरावे, भारताने संयुक्त राष्ट्रात धु धू धुतले

Dawood Ibrahim is in Pakistan: डी गँगचा म्होरक्या दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानतच असल्याचा दावा भारताने संयुक्त राष्ट्रात केला. पाकिस्तानला भारताने संयुक्त राष्ट्रात धु धू धुतले.

दाऊद इब्राहिम पाकिस्तानच, हे घ्या पुरावे, भारताने संयुक्त राष्ट्रात धु धू धुतले
दाऊद इब्राहिम पाकिस्तानच, हे घ्या पुरावे, भारताने संयुक्त राष्ट्रात धु धू धुतले
| Updated on: Oct 22, 2026 | 1:22 PM

Dawood Ibrahim is in Pakistan: संयुक्त राष्ट्राच्या एका विशेष प्रतिनिधीने गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीला भारताचा अपराधीक समूह म्हटले. त्यानंतर भारत संतप्त झाला. ही पाकिस्तानची आगळीक आहे हे समजायला भारतीय प्रतिनिधींना क्षणाची ही वेळ लागला नाही. भारताने संयुक्त राष्ट्रात पाकिस्ताना धु धू धुतले. दाऊद पाकिस्तानातच लपला आहे. ओसामा बिन लादेन ज्या देशात लपला होता आणि मारल्या गेला होता, त्याच देशात दाऊद लपल्याचा सणसणीत टोला भारतीय प्रतिनिधीने लगावला आहे. तर याविषयीचे अनेक पुरावे उपलब्ध असल्याचेही प्रतिनिधी सांगायले विसरले नाहीत.

भारताची विशेष प्रतिनिधीला जोरदार चपराक

Loading...

भारताने दहशतवादविरोधी अहवालातील पक्षपातावरून संयुक्त राष्ट्र संघाच्या विशेष प्रतिनिधीला चांगलेच धारेवर धरले. दाऊद इब्राहिम हा गेल्या कित्येक वर्षांपासून पाकिस्तानच्या मोठ्या शहरात आश्रयाला आहे आणि बाब सगळ्यांनाच माहिती असताना पक्ष पात करत तो भारतात गुन्हेगारी कृत्य करत असलेल्या समूहाचा प्रमुख असल्याचा खोडसाळपणा केल्याबाबत चागंलेच सुनावले. दाऊदशी भारताचा काहीही संबंध नाही, तो पाकिस्तानमध्ये लपून बसलेला आहे. त्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत आणि त्याचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे ही भारताने सुनावले.

तुमचा अहवाल दुरूस्त करा

भारताने विशेष प्रतिनिधीच्या अहवालावर नाराजी जाहीर केली. भारतीय प्रतिनिधी रघु पुरी यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत खडे बोल सुनावले. त्यांनी भारताची कडक भूमिका मांडली. विशेष प्रतिनिधींनी दाऊद इब्राहिम हा भारतीय दहशतवादी असल्याचे जे म्हटले आहे, त्यावर त्यांनी आक्षेप नोंदवला. तसेच ही घोडचूक तात्काळ दुरूस्त करण्याची मागणी केली. संयुक्त राष्ट्र संघाच्या कारभारावर आणि कार्यशैलीवर अगोदरच नाराजी सुरू असताना अशा चुका करणे योग्य नसल्याचे भारतीय प्रतिनिधींनी फटकारले.

दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच

भारतीय प्रतिनिधी रघु पुरी यांनी दाऊद हा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार आहे, तो पाकिस्तानात लपला आहे, असे सांगितले. 2003 मध्येच सुरक्षा परिषदेने डी-कपंनी आणि त्याचा प्रमुख हा अल कायदा सारख्या दहशतवादी संघटनेसोबत जोडल्या गेल्याचे म्हटलेले आहे. दाऊद इब्राहिम हा 1993 मधील मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी हवा आहे. तो पाकिस्तानात लपलेला आहे, ही गोष्ट जगजाहीर आहे. त्यासंबंधीचे अनेक पुरावे उपलब्ध आहे. असे असतानाही त्याचा भारताशी संबंध जोडणे आणि भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न करणे योग्य नसल्याचे भारतीय प्रतिनिधीने फटकारले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us